आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Electricity Supply Cut Off For 8 Hours In Kamtwade Area Of Nashik, Citizens Shocked Due To Loss Of Electricity During Examination Of Students.

नाशकातील कामटवाडे भागात 8 तास वीजपुरवठा खंडित:विद्यार्थ्यांच्या परीक्षा काळात वीज गायब झाल्याने नागरिक हैराण

नाशिक16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडको तसेच परिसरात वीज पुरवठा खंडित होणे ही बाब नित्याचीच झाली असून, शनिवारी नागरिकांना कुठली पूर्वकल्पना न देता कामटवाडे भागात तब्बल आठ तास वीज गायब झाल्याने परीक्षा काळात विद्यार्थी व नागरिक हैराण झाले होते.

कामटवाडे भागाला सातपूर विभागाकडून वीज पुरवठा केला जातो. या ठिकाणी वीज मंडळाच्या चार मुख्य डीपी आहेत. त्यामुळे या ठिकाणी कोणतेही काम करावे लागल्यास येथील मुख्य वीज प्रवाह बंद करावा लागतो. आयटीआय पुलापासून तर अंबड कामटवाडे, खुटवड नगर या संपूर्ण भागातील वीजपुरवठा खंडित करावा लागतो. त्यामुळे या संपूर्ण भागातील नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. शनिवारी या भागात रस्त्यांवर अनेक झाडे व त्यांच्या फांद्या या वीज तारांना स्पर्श करत असल्याने पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून वीज मंडळ या फांद्या तोडण्याचे काम करते. शनिवारी या संपूर्ण भागातील रस्त्यावरील फांद्या तोडण्यासाठी सकाळी नऊ ते चार वाजेपर्यंत या संपूर्ण भागातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला. ऐन परीक्षा काळात अशाप्रकारे वीज गायब होत असल्यामुळे विद्यार्थ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागला.

कामगारांना सुट्टी आणि वीज गायब

या संपूर्ण भागात कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात राहत आहेत. त्यांना आठवड्याची शनिवारी सुट्टी मिळत असते. ही सुट्टी असताना बँक व इतर अनेक कामे कामगार वर्गाला करावे लागतात. मात्र वीजच गायब असल्याने कोणतेही कामे होत नाही त्यामुळे कामगार वर्गालाही मोठा त्रास सहन करावा लागला.

वीज वितरण अधिकारी हेमंत भिरुड म्हणाले की, वृक्षतोडीसाठी वीस पुरवठा खंडित - सातपूर रस्त्याने पुढे कामटवाडे भागात रस्त्यांवर अनेक झाडांच्या फांद्या या वीज तारांना स्पर्श करत असल्याने, शासनाची परवानगी घेऊन या भागातील वीज पुरवठा खंडित करत झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्या. त्यामुळे वीज पुरवठा बंद होता. मात्र सायंकाळी 4 वाजता तो सुरळीत करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...