आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये दीड दिवसापासून बत्ती गूल:पाथर्डीफाटा परिसरात वीज पुरवठा खंडित; रहिवासी त्रस्त

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पाथर्डी परिसरातील स्वामी समर्थ नगर गजानन महाराज कॉलनी दामोदर चौका परीसरात दीड दिवसापासून वीज नसल्याकारणाने अंधारात आहे.

स्वामी समर्थ केंद्राजवळ असलेल्या डीपीजवळील वायर तुटल्याने येथील वीजपुरवठा खंडित झाल्याचे सांगण्यात येत आहे .पाथर्डी परिसरातील काल पाथर्डी उपकेंद्र येथे 33 केव्ही च्या कामासाठी सर्व वाहिन्यांचा वीज पुरवठा संध्याकाळी पाच वाजेपासून तर रात्री आठ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आला होता.वेळेवर दुरुस्तीचे काम होत नाही त्यामुळे ग्राहकांना व नागरिकांना याचा मनस्ताप व त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांम

वेळा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. परिसरातील अनेक ठिकाणी सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असल्याने महिलांना अनेक बाबींचा सामना करावा लागत आहे घरातील पाणी भरणे विजेवरील उपकरणे बंद आहेत दि.1 राेजी दिवसभर व रात्रभर महिलांना वीज नसल्या

कारणाने मोठा मनस्ताप सहन करावा लागला. काहींनी आंघोळी विनाच आजचा दिवस काढला दिवसभरात लाईट नसल्याने गैरसोय झाली. याला सर्वस्वी जो जबाबदार असेल त्याची चौकशी होऊन तेवढ्या तासाची भरपाई ही ग्राहकांच्या बिलामधून वजा करण्यात यावी अशी मागणी नागरिक समस्या निवारण समिती नाशिक जिल्हा अध्यक्ष संदीप जगझाप यांनी केली आहे. परिसरातील वीजपुरवठा अनेकदा खंडित होत असल्याने वेळोवेळी या संदर्भात लोकप्रतिनिधी व रहिवाशांनी तक्रारी केल्या, आंदोलन करण्याचे इशाराही दिले परंतु त्याचा कुठलाही एक फायदा होत नसून या भागातील विविध पुरवठा खंडित होणे हे नित्याचीच बाब झाल्याने नागरिकांना ऐन सणासुदीमध्ये मनस्ताप सहन करावा लागत आहे.

या विभागामध्ये वेळोवेळी डीपी मध्ये बिघाड होणे, अनेकदा वायरी तुटणे , पाऊस वाऱ्यांमध्ये ही वीजपुरवठा खंडित होत असतो त्यामुळे परिसरातील रहिवाशांना अनेकदा या सर्व बाबींचा त्रास सहन करावा लागत आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची अपेक्षा रहिवाशांनी व्यक्त केली आहे. कालपासून परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठीचे प्रयत्न सुरू होते परंतु आज संध्याकाळपर्यंत सुद्धा वीज पुरवठा सुरळीत झालेला नव्हता. वीज अभियंता वारे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते फोन उचलत नसल्याच्या अनेक तक्रारी रहिवाशांनी आहेत.

रहिवाशी सुभाष महाले म्हणाले की, मागील 35 तासापासून स्वामी समर्थ केंद्र ,गजानन महाराज कॉलनी व इतर भागातील वीजपुरवठा वायर तुटल्याने खंडित झाला असून त्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. वितरण कंपनीने गांभीर्याने याची दखल घ्यावी .अन्यथा वीज वितरण कंपनी समोर आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही.

बातम्या आणखी आहेत...