आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज कर्मचाऱ्यांच्या संपाची दोनशेंवर उद्याेगांना झळ:किमान 50 काेटींचा फटका; उद्याेजकांनी स्वत: सुरळीत केला पुरवठा

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वीज कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या 72 तासांच्या संपाचा तीव्र फटका नाशिकमध्ये उद्याेगांना बसला. बुधवारी पहाटे 2 वाजेपासून अंबड औद्याेगिक वसाहतीतील जवळपास 200 उद्याेगांचा विज पुरवठा खंडीत झाल्याने उद्याेगांचे काम ठप्प झाले. उद्याेजकांनी स्वत: पुढे येऊन त्यांच्या कर्मचाऱ्यांना साेबत घेऊन हा वीज पुरवठा सुरळीत करण्यात मदत केल्याने 11 वाजेपासून वीज पुरवठा सुरू झाला. तीन तास विज नसल्याने उद्याेगांचे जवळपास 50 काेटी रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

अंबड औद्याेगिक वसाहतीतील हार्डी स्पायसर कंपनी समाेरील डी-1, डब्ल्यु सेक्टर, सुमीत मशिनरीजचा सगळा परीसर येथे हा वीज पुरवठा बंद झाल्याने उद्याेगांना काम करणे अशक्य झाले. तर पहिल्या पाळीत कामावर आलेल्या कामगारांवर बसून रहाण्याची वेळ आली. दरम्यान अंबड इंडस्ट्रीज अण्ड मॅन्युफॅक्चरर्स असाेसिएशन (आयमा)चे अध्यक्ष निखिल पांचाल अाणि पदाधिकाऱ्यांनी पुढे येऊन त्यांच्या इलेक्ट्रिकल विभागातील कुशल कर्मचाऱ्यांना साेबत घेऊन 132 केव्ही सबस्टेशन गाठले. महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांसह उद्याेजकांच्या कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा सुरळीत केला.

यामुळे सकाळी 11 वाजेपासून उद्याेगांचे कामकाज पुन्हा सुरळीत सुरू झाले. महावितरणचे कर्मचारी संपावर असले तरी आमच्याकडे इलेक्ट्रिकल उद्याेगांतील कर्मचारी उपलब्ध असून इतरत्रही मदत लागल्यास ती करण्याचे आश्वासन आयमाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

50 काेटींचे नुकसान

पहाटे 2 ते सकाळी 11 वाजेपर्यंत वीज पुरवठा ठप्प असल्याचा फटका 200 पेक्षा अधिक उद्याेगांना बसला. या उद्याेगांना पहिल्या पाळीतील काम किमान तीन तास बंद ठेवावे लागले, यामुळे किमान 50 काेटींचे नुकसान झाले. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी चांगले सहकार्य केल्याने आमचे कामगार घेऊन आम्ही वीजपुरवठा नियमित सुरू करू शकलाे. - निखील पांचाळ, अध्यक्ष, आयमा

आईस्क्रिम व्यवसायालाही फटका

वीज पूरवठा तीन-चार तास बंद राहीला तरी आईस्क्रिम आणि कॅण्डी वितळत नाहीत मात्र सलग सहा तासांपेक्षा अधिक काळ वीज बंद असल्याने माेठ्या प्रमाणावर आईसक्रिम आणि कॅण्डी वितळल्या आणि माेठे नुकसान सहन करावे लागले. - दर्शन ताजणे, भरकादेवी आईस्क्रिम आऊटलेट

वीज पूरवठा सुरळीत करण्यासाठी स्वत: सांभाळत 132 केव्ही सबस्टेशन गाठले
वीज पूरवठा सुरळीत करण्यासाठी स्वत: सांभाळत 132 केव्ही सबस्टेशन गाठले
बातम्या आणखी आहेत...