आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:सिद्धिविनायक पतसंस्थेतील अपहार; चार संशयितांची सेंट्रल जेलमध्ये रवानगी

ओझर4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील सिद्धिविनायक पतसंस्थेत सुमारे तीन कोटी ते ३३ लाख २५ हजार रुपयांच्या अपहार प्रकरणी चाैघा संशयितांची पाेलिस काेठडीची मुदत संपल्याने त्यांना आर्थिक गुन्हे शाखेने पिंपळगाव न्यायालयात हजर केले हाेते. यावेळी न्यायालयाने चाैघा संशयितांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्याचा आदेश दिल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अशोक मेश्राम यांनी दिली.

ओझर येथील सिद्धिविनायक संस्थेत तीन काेटी ३३ लाख रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार तुषार बाजीराव पगार यांनी आेझर पाेलिस ठाण्यात दाखल केली हाेती. त्यानुसार आेझर पाेलिसांनी कारवाई करत मुख्य सूत्रधार दिनेश सौचे, वृंदा दिनेश सौचे, सचिन बाळासाहेब इंगळे, प्रवीण जीभाऊ आहेर, महेश रामदास शेळके, प्रमोद अमृत जाधव या संशयितांविराेधात गुन्हा दाखल केला हाेता.

संशयितांपैकी बँकेचे लेखापाल दिनेश सौचे, सचिन इंगळे, प्रवीण अहिरे, महेश शेळके यांना पिंपळगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २१ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली हाेती. पुढील तपास ओझर पोलिस ठाण्याकडून आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी संशयितांची पाेलिस काेठडी संपल्याने त्यांना न्यायालयात हजर केले हाेते.

बातम्या आणखी आहेत...