आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Embezzlement Of Rs 1 Crore From The Workers By The Company Owner; A Case Has Been Registered Against The Owner Of Premium Tools| Marathi News

फसवणुकीचा गुन्हा:कामगारांच्या १ काेटी रुपयांचा कंपनीमालकाकडून अपहार; प्रीमियम टूल्सच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

नाशिक15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कंपनी कामगारांच्या सोसायटी आणि शेअर्स रक्कम तसेच कर्जाच्या हप्त्यांची नियमित रक्कम एम्प्लाॅइज को-आॅप. क्रेडिट सोसायटीत भरणा न करता कंपनीमालकाने १ कोटी ३ लाख ९० हजार रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार साेसायटीच्या लेखापरीक्षणात उघडकीस आला. याप्रकरणी शासकीय लेखापरीक्षकांच्या तक्रारीनुसार, कंपनी मालकाविरुद्धच सातपूर पाेलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातपूर एमआयडीसीतील प्रीमियम टूल्स कंपनीचे मालक संशयित श्याम चंद्रकात केळुस्कर (रा. सातपूर) यांच्या कंपनीतील कामगारांनी एम्प्लाॅइज साेसायटीची स्थापना केली हाेती. यात, सप्टेंबर २०१४ पासून कामगारांच्या पगारातून शेअर्स आणि कामगारांंच्या कर्जाचे हप्ते, व्याज अशी रक्कम महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम कायद्यानुसार कपात केली जात हाेती. ही रक्कम सोसायटीते जमा करणे आवश्यक हाेते. तसेच वेतन अधिनियम कायद्यानुसार कंपनीला अनिवार्य असलेली रक्कम भरणे आवश्यक हाेते. मात्र, केळूस्कर यांनी १ कोटी ३ लाख ९० हजार रुपयांची रक्कम भरणाच केला नसल्याचे उघडकीस आली आहे. यावरुन कंपनी कामगार आणि शासनाची फसवणूक केल्याचे समाेर आले आहे. त्यानुसार कामगार आणि साेसायटीचे लेखापरीक्षक संताेप कदम यांनी पाेलिसांत तक्रार दाखल केली आहे.

बातम्या आणखी आहेत...