आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंपनी मालकावर गुन्हा:कामगारांच्या सोसायटी कर्जाचा केला अपहार, 1 कोटी 3 लाखांनी घातला गंडा

नाशिक12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कंपनी कामगारांच्या सोसायटी आणि शेअर्स रक्कम तसेच कर्जाचे हफ्त्यांची रक्कम एम्पलाॅइज को ऑफ क्रेडिट सोसायटीमध्ये भरणा न करता कंपनी मालकाने 1 कोटी 3 लाख 90 हजारांच्या रक्कमेचा अपहार केल्याचा प्रकार प्रिमियम टुल्स प्रा.लि. सातपूर या कंपनीत उघडकीस आला. सातपूर पोलिस ठाण्यात कंपनी मालक श्याम चंद्रकात केळुसर रा. सातपूर यांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती आणि संतोष कदम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित श्याम केळुसकर यांच्या मालकीची सातपूर एमआयडीसीमध्ये प्रीमियम टुल्स प्रा. लि. कंपनी आहे. सप्टेंबर 2014 पासून कंपनीचे कर्मचारी यांच्या पगारातून सोसायटीच्या मागणीप्रमाणे शेअर्स आणि कामगारांना घेतलेले कर्जाचे हफ्ते आणि कर्जाचे व्याजापोटी कपात केलेली रक्कम महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम कायद्या नुसार कपात केलेली रक्कम प्रिमीयम टुल्स एम्लाॅइज को आॅफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड सातपूर या संस्थेकडे जमा करणे आवश्यक असतांना तसेच वेतन अधिनिय कायद्यानुसार देणे अनिवार्य असलेली रक्कम भरणे आवश्यत असतांना संशयित कंपनी मालकाने १ कोटी ३ लाख ९० हजार रुपये भरणा न करता कंपनी कामगारांची आणि शासनाची फसवणूक केली. वरिष्ठ निरिक्षक महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुुरु आहे.

ऑडिटमध्ये प्रकार उघड

कंपनी मालकाने कामगारांचे वेतनातून रक्कम कपात केली मात्र ती क्रेडीट सोसायटीमध्ये भरणा केली नाही. रक्कम परस्पर वापर केला. लेखापरिक्षणामध्ये हा प्रकार उघडकीस आला.

बातम्या आणखी आहेत...