आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बावीस कोटींचा अपहार; पंकज पारख यांना अटक:पथकाने पारख यांचा माग काढत केली अटक

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येवला येथील कै. सुभाषचंद्र पारख नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन पंकज पारख यांना गुरुवारी २२ कोटींच्या अपहारप्रकरणी अटक करण्यात आली. ग्रामीण पोलिस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरात एका निवासी प्रकल्पातील फ्लॅटमध्ये ही कारवाई केली. याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी,पंकज पारख, चेअरमन योगेश सोनी, व्यवस्थापक अजय जैन आणि संचालक मंडळाच्या विरोधात सहायक निबंधक प्रताप पाडवी यांच्या तक्रारीनुसार २१ कोटी ९६ लाख ९९ हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. संशयित पंकज पारख हे शहरात असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. पथकाने संशयित पारख यांचा माग काढत त्यांना अटक केली. आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक अशोक मेश्राम यांनी अधीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.

बातम्या आणखी आहेत...