आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संवाद:आरोग्याविषयी जागरूकता, प्रात्याक्षिक ज्ञानावर भर दिल्यास यशमार्ग सुकर

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अद्ययावत शिक्षण प्रणालीत तंत्रज्ञानाला अभिप्रेत असणारा अभ्यासक्रम पूर्ण करताना आपल्या आरोग्याविषयीची जागरूकता ठेवून तसेच प्रात्यक्षिक ज्ञानावर जास्तीत जास्त भर देत मार्गक्रमण केल्यास यशमार्ग सुकर हाेताे. असा संवाद मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांनी पालक- शिक्षक मेळाव्यात विद्यार्थ्यांना केले.

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या कर्मवीर अॅड. बाबूराव गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयात नव्याने प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांचा पालक- शिक्षक मेळावा उत्साहात पार पडला. मेळाव्यासाठी संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉ. डी. डी. लोखंडे, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. आर. देवणे, उपप्राचार्य प्रा. नितीन देसले, प्रथम वर्ष विभागप्रमुख डॉ. सुदर्शन कोकाटे तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक- शिक्षकेतर सेवक वर्ग उपस्थित होते.

संस्थेचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. पालक प्रतिनिधी सचिन मोगल यांनी, विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासक्रमाबरोबर आपले आरोग्य उत्तम व निरोगी राहण्यासाठी मैदानी खेळांत सहभाग नोंदवावा व त्यात प्रावीण्य मिळवावे, असे सांगितले. प्राचार्य डॉ. एस. आर. देवणे, तसेच उपप्राचार्य, प्रा. नितीन देसले यांनी विद्यार्थी, पालक यांचे स्वागत केले. यावेळी विद्यार्थी देखील माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...