आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओझर:व्यवस्थापन व एचएएल कामगार युनियन यांच्या ढिसाळ कारभारावर कर्मचारी संतप्त

ओझर / तुषार झोडगेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ओझर येथील एअर फोर्स कॉर्नरवर एचएएल कामगारांना पोलीस प्रशासनाने रोखले

नाशिक जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापना मार्फत दिनांक 12 मे ते 22 मे पर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या आदेशानुसार बुधवारी दुपारी 12 वाजेपासून कडक आदेशाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. त्यानंतर भारतीय वायुसेनेचा कणा म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाशिक जिल्ह्यातील विमाननिर्मिती कारखाना हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एच.ए.एल) येथील कामगारांना जिल्हाधिकारी यांनी लागू केलेल्या आदेशाचे पालन करत उद्योगांना कामगारांसाठी त्यांचा आवारातच राहण्याची व भोजनाची सोय करून कामावर हजार राहावे असे आदेश आहे. त्यामुळे पोलीस उपविभागीय अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दलाकडून ओझर येथिल एअर फोर्स कॉर्नर येथे नाकाबंदी लावण्यात आली. त्यानंतर दुपारी तीन वाजेच्या शिपसाठी कामावर जाणाऱ्या कामगारांना बंदी घालण्यात आल्याने, जवळपास एक हजाराहून अधिक कामगारांना घरी परतावे लागल्याने कामगारांकडून व्यवस्थापन व एचएएल कामगार युनियन यांच्याविरुद्ध संताप व्यक्त करण्यात आला. कामगारांकडून सांगण्यात आले की, जिल्हाधिकारी यांनी जर 10 मे रोजी प्रसारित केलेल्या आदेशानुसार जर सर्व नियमावलीची अंमलबजावणी करण्यात येणार होती. तर कारखान्यातील व्यवस्थापन व एचएएल कामगार संघटना गेल्या दोन दिवसांपासून बैठकांवर बैठका घेत असतानाही यातून कोणत्याही प्रकारचे सकारात्मक उत्तर कामगारांना लेखी स्वरूपात किंवा मॅसेज द्वारे का कळविले नाही?

बुधवारी दुपारपासून लागू झालेल्या नियमांचे पालन करताना पोलीस प्रशासनाने कठोर कारवाईचे हत्यार उपसल्याने सर्व कामगारांना घरी जावे लागले. केवळ एचएएल कामगार युनियन व व्यवस्थापनाच्या ढिसाळ कारभारामुळेच कामगारांची सुट्टी पडल्याने सुट्टीच्या बदल्यात आम्हाला पगार मिळालाच पाहिजे अशी मागणी केली. कामगारांकडून एक मुखाने विचारले जाऊ लागल्याने काही युनियन पदाधिकाऱ्यांनी कामगारांच्या तीव्र भावना शांत करत आम्ही आहोत. ही सुट्टी पगारी मिळेल असे आश्वासन दिल्यानंतर सर्व कामगार तब्बल एक तासाच्या प्रदीर्घ काळानंतर ओझर येथील एअर फोर्स करणार येथून माघारी परतले. परंतु यावर कामगारांकडून तीव्र असंतोष निर्माण झाला असून लवकरात लवकर येत्या दहा दिवसांच काय त्याबद्दल सर्व माहिती द्यावी.

कामगारांना एचएएल कामगार संघटनेच्या लेटरहेडवर नोटीफिकेशन जाहीर करावे व सोशल मीडियावर कोणताही मेसेज पाठवू नये जेणेकरून कामगारांमध्ये कोणत्याही प्रकारचे गैरसमज निर्माण होणार नाही अशा प्रकारच्या भावना कामगारांनी दै.दिव्य मराठीच्या प्रतिनिधीशी बोलून व्यक्त केल्या. आज झालेल्या सर्व ढिसाळ कारभाराला एकमेव व्यवस्थापन व एचएएल कामगार संघटना कारणीभूत असल्याचे काही ज्येष्ठ कामगारांकडून सांगण्यात आले आहे.

बुधवारी दुपारी कामगार घरी परतल्याच्या पार्श्वभूमीवर माहिती घेण्यासाठी दै. दिव्य मराठी प्रतिनिधीने फोन केला असता उपमहाप्रबंधक अनिल वैद्य यांनी मला कोणत्याही प्रकारची माहिती नसल्याचे सांगत आमच्या पर्यंत कोणतीही कारखाना बंद करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांचे आदेश आलेले नसल्याने आमचे सर्व कामगार वेळेवर कारखान्यात उपस्थित असल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु बुधवारी दुपारी घरी परत गेलेल्या कामगारांविषयी विचारले असता असे कोणताही प्रकार घडलेले नसल्याचे सांगत त्यांनी सारवासारव केली आहे. त्यामुळे घरी परतलेल्या कामगारांकडून मोठ्या प्रमाणात असंतोषाची लाट व्यवस्थापना विरोधात निर्माण झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...