आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशिक्षणाची उत्तम संधी:नोकरदार, व्यावसायिकांनाही आता आयटीआयमध्ये प्रवेश

नाशिक6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातपूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये आता प्लंबर, गवंडी, ड्रोन आणि सीएनसी प्रोग्रामिंग हे अल्प मुदतीचे ट्रेड सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या काम करत असलेल्या नोकरदार तसेच या क्षेत्रातील व्यावसायिकांना प्रशिक्षणाची उत्तम संधी प्रथमच उपलब्ध झाली आहे.

पारंपरिक पद्धतीने अनुभवातून शिकलेल्या व्यक्तींना सध्याच्या स्पर्धेच्या युगात टिकून रहावयाचे असेल तर त्यांना अद्ययावत ज्ञान आणि तंत्रज्ञान आत्मसात करावे लागेल. त्यातून व्यवसायवृद्धी होऊ शकते. हीच बाब हेरून सातपूर आयटीआयने प्लंबर, गवंडी आणि सीएनसी प्रोग्रामिंग या वर्षभराच्या अभ्यासक्रमांचा कालावधी आता अडीच ते चार महिन्यांच्या केला आहे. त्याचे वर्गही सायंकाळी ६ वाजता भरणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...