आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइन आयोजन:रोजगार मेळावा 28 जूनपासून ; जास्तीत जास्त इच्छुकांनी लाभ घेण्याचे आवाहन

नाशिकएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे २८ ते ३० जून दरम्यान महास्वयंम वेबपोर्टलवरून ऑनलाईन पद्धतीने पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. मेळाव्यातील मुलाखती मोबाईल, दूरध्वनी, व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे घेतल्या जातील. ऑनलाईन पद्धतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर किंवा अँड्रॉइड मोबाईल धारकांनी प्ले स्टोअरमधून mahaswayam मोफत अॅप डाऊनलोड करुन नोंदणी करावी.

अधिक रिक्तपदे नोंदवा भरती इच्छुक नियोक्त्यांनी जास्तीत जास्त रिक्तपदे वेबपोर्टलवर पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा नाशिक यावर त्यांच्याकडील रिक्तपदे जनरल, ईपीपी, ॲप्रेटिस इत्यादी अधिसूचित करावी. या मनुष्यबळाच्या मागणीची जाहिरात व प्रसिद्धी विभागाच्या वेब पोर्टलवर विनामूल्य करावी. याबाबत काही अडचण आल्यास सहाय्यासाठी ०२५३-२९९३३२१ वर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा. या मेळाव्याचा जास्तीत जास्त इच्छुक नियोक्ते आणि बेरोजगार उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या नाशिकच्या सहाय्यक आयुक्त अ. ला. तडवी यांनी केले आहे.