आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक येथे 14 फेब्रुवारीला विभागीय रोजगार मेळाव्याचे आयोजन:बेरोजगार उमेदवारांनी उपस्थित राहुन लाभ घेण्याचे आवाहन

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागिय आयुक्तालय, नाशिक विभाग आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संचलित राजर्षी शाहु महाराज पॉलिटेक्निक काॅलेज यांच्या संयुक्त विद्यमाने 14 फेब्रुवारी रोजी विभागीय राेजगार मेळाव्याचे आयाेजन करण्यात आले आहे.

सकाळी 9.30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत राजर्षी शाहु महाराज पॉलिटेक्निक, उदोजी मराठा बोर्डींग कॅम्पस गंगापुररोड या ठिकाणी नोकरीइच्छुक उमेदवारांकरीता पंडित दीनदयाळ उपाध्याय विभागीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध नामांकित कंपन्या, नियुक्त्या सकाळी 9.30 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत राजर्षी शाहु महाराज पॉलिटेक्निक येथे उपस्थित राहुन प्रत्यक्ष मुलाखती घेणार आहेत.

स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य करणारी शासनाची विविध महामंडळे यांचे स्टॉल लावण्यात येणार असुन कर्ज योजनांची माहिती व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या मेळाव्याचा जास्तीत जास्त भरती इच्छुक नियुक्त्या आणि बेरोजगार उमेदवारांनी उपस्थित राहुन लाभ घ्यावा असे आवाहन काैशल्य विकास, राेजगार व उद्याेजकता विभागाच्या नाशिकच्या आयुक्त अनिसा ला. तडवी यांनी केले आहे.

येथे करा सेवायाेजन नाेंदणी

या सुवर्ण संधीचा जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा. नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्याप पर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. तसेच लॉगीन करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी ॲप्लाय करावे.

नियाेक्त्यांनाही आयाेजकांकडून आवाहन

भरती इच्छुक नियोक्ते यांनी जास्तीत जास्त रिक्तपदे www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर Pandit Dindayal Upadhayay Job Fair ऑप्शनवर Click करुन पंडित दीनदयाळ उपाध्याय विभागीय रोजगार मेळावा, यावर रिक्तपदे अधिसूचित करावी व दिनांक 14 फेब्रुवारी रोजी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित रहावे. याबाबत काही अडचणी आल्यास सहाय्यासाठी कार्यालयाच्या 0253-2993321 या दूरध्वनीवर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा.

बातम्या आणखी आहेत...