आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिलासा:औरंगाबादसह नाशिक जिल्ह्यातील पाच कंपन्यांत तरुणांना रोजगार संधी

नाशिकएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऑनलाइन रोजगार मेळाव्यात 1115 पदांसाठी मुलाखतींना सुरुवात

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक यांच्याकडून गुरुवारपासून शनिवारपर्यंत ऑनलाइन पद्धतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यात औरंगाबादच्या कंपन्यांचाही सहभाग आहे. या कार्यालयाकडील नाशिक जिल्ह्यातील नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी सहाय्य होण्याच्या दृष्टीने हा ऑनलाइन रोजगार मेळावा आयोजित केला असून यामधील मुलाखती व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्याचे नियोजित करण्यात आलेले आहे.

सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे मागील काही दिवसांपासून अनेक औद्योगिक आस्थापना, व्यवसाय व उद्योग हे बंद होते. त्यामुळे या आस्थापनांमध्ये काम करणारे बरेचसे परप्रांतीय कामगार/मजूर हे गावी निघून गेले आहेत किंवा जात आहेत. आता शासनाने काही अटी व शर्तीच्या अधीन राहून कंपन्या औद्योगिक आस्थापना व्यवसाय उद्योग हे सुरू करण्यास मान्यता दिली आहे. मात्र, काही औद्योगिक आस्थापनांना मनुष्यबळाची आणि स्थानिक बेरोजगार उमेदवारांना कामाची आवश्यकता असल्याचे जाणवत आहे. यासाठी नियोक्ते आणि रोजगार इच्छुक उमेदवारांकरीता हा ऑनलाइन रोजगार मेळावा आयोजित केला आहे.

नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. तसेच या वेबपोर्टलवर लॉग-इन करुन जॉब फेअर टॅबवर क्लिक करुन NASHIK ONLINE JOB FAIR-1 (२०२०-२१) यामध्ये जाऊन पात्रतेप्रमाणे विविध कंपन्यांच्या उपलब्ध रिक्त पदांसाठी अर्ज करावे. सदर रोजगार मेळावा हा ऑनलाइन असल्यामुळे व मुलाखती ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याने या कार्यालयात प्रत्यक्षात कोणी हजर राहू नये.

या क्रमांकावर संपर्क करा

दूरध्वनी क्रमांक ०२५३ : २९७२१२१ या क्रमांकावर वर संपर्क करावा आणि या मेळाव्याच्या ऑनलाइन मुलाखती देऊन लाभ घ्यावा, असे आवाहन सुनील सैंदाणे, उपआयुक्त, नाशिक विभागीय आयुक्तालय आणि संदीप गायकवाड यांनी उमेदवारांना केले आहे. दरम्यान, या ऑनलाइन मेळाव्याला चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक

तापरिया टूल्समध्ये,ट्रेनी हेल्पर (पुरुष ) पदे – १५०, हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड ,मुसळगाव, पॅकर्स, पदे ५, ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स, ट्रेनी , एकूण पदे २, नरसिंहा ऑटो कंपोनंट‌्स प्रा.लि.वाळूज, औरंगाबाद, अप्रेंटिस (पुरुष) आयटीआय, टर्नर,मशिनिस्ट ग्राइंडर,फिटर-टूल अँड डाय मेकर पदे १०, अप्रेंटिस (पुरुष) डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअर पदे १०, विराज प्रोफाइल्स लि.एमआयडीसी तारापूर इंडस्ट्री ,आयटीआय क्रेन ऑपरेटर (पुरुष)-२०, मेकॅनिकल फिटर (पुरुष) -२००, वायर ड्रॉइंग मशीन ऑपरेटर (पुरुष)-२००, पिलिंग अँड ग्राइंडिंग मशीन ऑपरेटर (पुरुष)-२००, नट-बोल्ट फोर्जिंग ऑपरेटर (पुरुष)-२००, फॉर्जिंग ऑपरेटर (पुरुष)-१०० एकूण पदे -९२० अशी एकूण – १११५ रिक्त पदे ऑनलाइन प्राप्त झाली आहेत. या मेळाव्यासाठी या पाच नामांकित कंपन्यांचे नियुक्ती अधिकारी पात्र उमेदवारांच्या ऑनलाइन पद्धतीने मुलाखती घेऊन विविध पदांसाठीच्या रिक्त जागांसाठी निवड व भरती करणार आहेत. यामध्ये फक्त ऑनलाइन अर्ज केलेल्या उमेदवारांच्याच मुलाखती घेण्यात येणार असल्यामुळे ऑनलाइन अर्ज करणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...