आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झोपड्या:शाही मार्गावर झोपड्या थाटून केले अतिक्रमण, पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

नाशिक14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्मार्ट सिटी अंतर्गत साकारण्यात आलेल्या शाही मार्गावर झोपड्या थाटून पादचारी मार्गावर अतिक्रमण करण्यात आले आहे. या अतिक्रमणाकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून या मार्गासाठी केलेला कोट्यवधीचा खर्च वाया जात आहे.

पंचवटी, गोदाघाट परिसरात भाविक, पर्यटकांची गर्दी असते. कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना शाही मार्गाचे आकर्षण असते, मात्र या मार्गावर पर्यटकांना झोपड्यांचे दर्शन होत असल्याने शहराच्या विद्रुपीकरणात आणखी भर पडत आहे. मनपा प्रशासनाने मार्गावर वाढलेले अतिक्रमण काढण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...