आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउंटवाडी येथील सिटी सेंटर मॉलच्या पाठीमागील परिसरात खाद्यपदार्थविक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे या ठिकाणी कचरा पसरला असून येथे येणाऱ्या टवाळखाेरांच्या उपद्रवाने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. या प्रकाराकडे महापालिका व पाेलिसांचे दुर्लक्ष हाेत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
शहरातील सिटी सेंटर मॉल येथे खरेदीसाठी नागरिकांची वर्दळ असते. या मॉलमागील रस्त्यावर काही वर्षांपासून खाद्यपदार्थविक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे या ठिकाणी अस्वच्छता असून येथे येणाऱ्या टवाळखाेरांकडून गुंडगिरीचे प्रकार वाढले आहेत. हा भाग महापालिकेच्या नाशिक पश्चिम विभागात येत असून गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा भाग येताे. तसेच गंगापूर पाेलिस ठाण्याची ही शेवटची हद्द असल्याने या भागात कधीही पाेलिसिंग होत नसल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे.
मनपा आणि पोलिसांचे दुर्लक्ष
या ठिकाणी मनपाच्या पश्चिम विभागाचे दुर्लक्ष असून पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे आर्थिक हितसंबंध असल्याने खाद्यपदार्थांचे स्टॉल वाढले आहेत. तसेच गंगापूर पोलिस ठाण्याची हद्द असून पेट्रोलिंग होत नसल्याने गुंडगिरी वाढली असून या भागात युवक-युवतीचे अश्लील चाळे असे गैरप्रकार वाढले आहेत. येथे नशा करण्याचे प्रकार घडत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
नंदिनी नदीत टाकला जातो कचरा
येथील खाद्यपदार्थांचे विक्रेते तयार झालेला कचरा थेट नंदिनी नदीत टाकत असल्याने ही नदी प्रदूषित झाली आहे. याबाबत मनपाच्या आराेग्य विभागाने कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
टपऱ्या बनल्या मद्यपान व स्मोकिंगचे अड्डे
सिटी सेंटर मॉलच्या पाठीमागील भागात टपऱ्या व खाद्यपदार्थांचे स्टॉल असून या टपऱ्या जणू मद्यपान व स्मोकिंगचे अड्डे बनले आहेत. कुणीही या व मद्य पित बसा तसेच कुणीही या आणि सिगारेट आेढा अशी येथील परिस्थिती आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.