आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साेयीसाेयीने:सातपूरला अतिक्रमण मुख्य रस्त्यावर; पथकाची कारवाई औद्याेगिक वसाहतीत

सातपूर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणांकडे कानाडाेळा करत औद्याेगिक वसाहतीतील छाेट्या छाेट्या टपरीधारकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. एकूणच अतिक्रमण हटविण्याबाबत दुजाभाव केला जात असल्याचे चत्रि सातपूरमध्ये बघण्यास मिळत आहे.

सातपूर औद्योगिक वसाहतीतील संतोषीमाता नगररोडवरील नो हॉकर्स झोनमधील आठ ते दहा टपऱ्यांचे अतिक्रमण काढत साहित्य जप्त करण्याची कारवाई अतिक्रमण विराेधी पथकाने केली. मात्र सातपूर -त्र्यंबकेश्वर या महामार्गालगतच थाटण्यात येणाऱ्या भाजी बाजाराकडे पथकाकडून हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात आहे.

रस्त्याच्या कडेला सायंकाळच्या वेळी माेठ्या प्रमाणात भाजी विक्रेत्यांची दुकाने लागतात. परिणामी भाजी खरेदी करण्यासाठी येणारे ग्राहक रस्त्यावरच गाड्या उभ्या करून भाजी खरेदी करतात. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण हाेऊन अपघातांमध्येही वाढ हाेत आहे.

नाे हाॅकर्स झाेनमध्येच थाटली दुकाने महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून औद्याेगिक वसाहतीतील नाे हाॅकर्स झाेनमधील दुकानांवर कारवाई केली जाते. दुसरीकडे मात्र त्र्यंबकराेडवरील श्रीराम सर्कल समाेरच माेठ्या प्रमाणात अतिक्रमित फळ विक्रेते, मिसळ विक्रेते, चिकन विक्रेत्यांची दुकाने थाटली आहे. देशाच्या विविध भागातून देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना उघड्यावर मांस विक्रीची दुकाने बघून घृणा येते. मात्र अतिक्रमण पथकातील चमूला प्रत्येकाकडून दर महिन्याला बिदागी मिळत असल्याने हे अतिक्रमण दुर्लक्षित केले जात असल्याची चर्चा आहे.

अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यावरच केला हाेता गंभीर आराेप त्र्यंबकराेडला अतिक्रमित जागेवर मिसळचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाकडे अतिक्रमण विराेधी पथकातील कर्मचारी नेहमीप्रमाणे वसुलीसाठी गेला हाेता. त्यावेळी पैसे नसल्याचे कारण मिसळवाल्याने सांगितल्यानंतर कर्मचाऱ्याने पैसे नाही तर पत्नीला पाठव अशी मागणी केल्याचा आराेप मिसळवाल्याने केला हाेता. हे प्रकरण समाजमाध्यमांवर चांगलेच व्हायरल झाले हाेते.

बातम्या आणखी आहेत...