आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमण:रस्त्याच्या कामासाठी अतिक्रमणे हटविली ; नागरिकांचा वादविवाद

नाशिक2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

त्रिमूर्ती चौक ते माउली लॉन्स रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. मात्र रस्त्याच्या बाजूला असलेल्या अतिक्रमणांमुळे कामात अडथळे येत होते. त्यावर मात करण्यासाठी मनपाच्या वतीने कामटवाडे रस्त्यावरील सर्व अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. १०० फुटी रस्त्यावरील अनेक व्यावसायिकांसह काही घरमालकांनी केलेले अतिक्रमण काढण्यात आले.

कारवाईवेळी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांवर नागरिकांनी रोष व्यक्त केल्याने वादविवाद झाले. काही काळासाठी अतिक्रमण मोहीम थांबविण्यात आली होती. त्यानंतर पोलिस बंदोबस्तात पुन्हा अतिक्रमण मोहीम सुरू झाली. सायंकाळपर्यंत रस्त्यावरील बहुतेक अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. बुधवारी सकाळी अतिक्रमण विभागातील पथकाने तातडीने अतिक्रमणे काढणे सुरू केले.

अंबड औद्योगिक वसाहतीकडे जाणारा रस्ता म्हणजे मायको सर्कल, त्रिमूर्ती चौक ते माउली लॉन्स आणि पुढे प्रणय स्टम्पिंग कंपनीचा रस्ता आहे. परिस्थितीनुसार वाहतूक कोंडी वाढत आहे. त्यासाठी महापालिकेच्या वतीने शंभर फुटी रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. काही घरमालक तसेच व्यावसायिकांनी स्वतःहून अतिक्रमण काढले. तर ज्यांनी काढले नाही त्यांचे हटविण्यात आल्याने रस्त्याने मोकळा श्वास घेतला. सहाही विभागांतील अतिक्रमण पथकाच्या मदतीने आणि पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईचे परिसरातील नागरिकांनी स्वागत केले.

बातम्या आणखी आहेत...