आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माेहिम:मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण काढले

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हॉटेल व मिठाई दुकानांसमाेरील अतिक्रमण दुर्लक्षित असल्याचे डी.बी. स्टारने शनिवारी (दि. ५) राेजी सचित्र प्रसिद्ध केल्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांना जाग आली. त्यांनी त्याच दिवशी शहरातील मेनराेड, बाेहाेरपट्टी, एमजीराेड, अशाेकस्तंभावर अतिक्रमणविराेधी माेहिम राबवली.

महापालिकेच्या पथकाने मेनरोड येथून कारवाईला सुरुवात केली. त्यानंतर या पथकाने बोहाेरपट्टी, एमजीरोड व अशोकस्तंभ परिसरात अतिक्रमणांवर कारवाईचा बडगा उगारला. परंतु, परिसरात सकाळपासून कारवाईची कुणकुण लागली होती. त्यामुळे रस्त्यावरील दोन-चार छोटे-मोठे विक्रेते वगळता पथकाच्या हाती काही लागले नाही. पथकाची पाठ फिरताच व्यापारी, विक्रेत्यांनी पहिल्याप्रमाणे रस्त्यांवर अतिक्रमण केल्याने ही कारवाई फार्स ठरली आहे. मात्र, इंदिरानगर, उपनगर व शरणपूररोड भागात अनेक रस्त्यांवरील खाद्यपदार्थांच्या दुकानांवर कारवाई करण्यात आली. स्वीट मार्टसमाेरील वाहनेही हटवून यानंतर दुकानासमाेरील वाहनांमुळे वाहतूक ठप्प हाेणार नाही यासाठी काळजी घेण्याची सूचना दिली.

मोठा फौजफाटा घेऊन कारवाई : शहरातील पूर्व आणि पश्चिम भागात महापालिकेकडून शनिवारी ५० वर कर्मचाऱ्यांसह ६ ट्रक सोबत घेऊन कारवाई करण्यात आली. मेनरोड, शालिमार व नेहरू उद्यानाजवळ पथक येण्यापूर्वीच परिसरातील व्यापारी व विक्रेत्यांना कारवाईची वर्दी मिळाल्याने ते कारवाईतून सुटले. तर रस्त्यावरील छोट्या व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारत मोठ्या आवेशात पथक मार्गस्थ झाले.मात्र, पथकाची पाठ फिरताच व्यापाऱ्यांनी पुन्हा अतिक्रमण केले. यामुळे आता या भागात रोज अतिक्रमण मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...