आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदग्रहण सोहळा:युवा पिढीच्या सक्षमीकरणासाठी अनुमोदन ग्रुप; पदग्रहण उत्साहात

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

युवा पिढीच्या सक्षमीकरणासाठी आणि प्रगतीसाठी जैन समाजातील युवकांनी एकत्र यावे या संकल्पनेतून उमेश खिंवसरा, दीपक संचेती आणि ऋषभ बाफना यांनी अनुमाेदन ग्रुपची स्थापना केली. सामाजिक दातृत्वातून स्थापना झालेल्या ग्रुपचा औपचारिक उद‌्घाटन सोहळा आणि पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला.

नवकार मंत्राने दीपप्रज्वलन करून तसेच भगवान महावीर स्वामी आणि सरस्वतीमातेच्या प्रतिमेला वंदन करून कार्यक्रमाचे उद‌्घाटन करण्यात आले. मोबाइल अॅपचे उद‌्घाटन करण्यात आले. यावेळी राैनक जालोरी यांना अध्यक्षपदाची शपथ तर शीतल खिंवसरा यांना महिला अध्यक्ष म्हणून शपथ देण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून शुभम कर्नावट तर सचिवपदी अल्पेश भटेवरा व महिला सचिवपदी तन्वी खिंवसरा यांची नियुक्ती करण्यात आली. प्रास्ताविक उमेश खिंवसरा यांनी केले.

अल्पेश भटेवरा यांनी संस्थेच्या कार्याविषयी माहिती दिली व शुभम कर्नावट यांनी आभार व्यक्त केले. सूत्रसंचालन लोकेश कटारिया यांनी केले. प्रमुख पाहुणे माजी सैनिक संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मेजर फुलचंद पाटील, महावीर इंटरनॅशनल संस्थेचे अध्यक्ष अनिल नहार, नयन बुरड, जितो युवाचे अध्यक्ष हर्षित पहाडे, हितेश बाफना आदी उपस्थित होते.

क्रिकेट लीग ट्राफी
अनुमोदन ग्रुपच्या माध्यमातून १८ डिसेंबर रोजी भरविण्यात येणाऱ्या अनुमोदन प्रीमियर लीग या बॉक्स क्रिकेट लीगच्या ट्रॉफीजचे उद‌्घाटन नऊ संघमालकांच्या व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ऋषभ बाफना, दीपक संचेती, शुभम फुलफगर, यश कोठारी, रोशन कोटेचा, धीरज बाफना, तनिष सोलंकी, वृषभ बेदमुथा, चेतन संचेती, समता दुगड आदी उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...