आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभियंता दिनेशकुमार बागुल यांचे लाखोंचे लाच प्रकरण:पुणे, नाशिकच्या निवासस्थानी छापे; 1 कोटी 44 लाखांची माया, कागदपत्र जप्त

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अदिवासी विभागाचा बांधकाम अभियंता दिनेशकुमार बागुल याच्या पुणे येथील निवासस्थानी 45 लाख 40 हजार आणि नाशिक येथील फ्लॅट मधून 98 लाख 63 हजारांची रोकड एसीबीच्या पथकाने हस्तगत केली. या दोन्ही घरातून महत्वाचे कागदपत्र जप्त करण्यात आले असून बागुले यांनी कोट्यावधीची मालमत्ता जमा केल्याचा संशय आहे.

शुक्रवार ता. (26) रोजी न्यायालयात त्यांना हजर केले असता न्यायालयाने रविवार (ता. 28) पर्यंत 3 दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. आश्रम शाळेच्या सेंट्रल किचनचे टेंडरचा कार्यरंभ आदेश देण्यासाठी ठेकेदाराकडून 12 टक्के दराने कमिशनपोटी 28 लाख 80 हजारांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली होती.

आदिवासी विभागाचे हरसुल अदिवासी आश्रम शाळेसाठी आर.के इन्फ्रा काॅन्स्ट्रो प्रा.लि. कंपनीने सेंट्रल किचनचे 2 कोटी 40 लाखांचे ऑनलाईन टेंडर भरले होते. ऑनलाईन प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर ठेकेदाराला हे टेंडर मिळाले होते. मंजुर टेंडरचे कार्यारंभ आदेश देण्यासाठी अभियंता बागुल याने टेंडरच्या किमंतीचे 12 टक्के दराने 28 लाख 80 हजार कमिशनची मागणी केली होती.

ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे पंधरा दिवसांपुर्वी तक्रार केली होती. पथकाने सलग पंधरा दिवस सापळ रचत बागुल यास त्याच्या राहते घरी लाचेची रक्कम स्विकारतांना अटक केली. निरिक्षक अनिल बागुल, किरण अहिरराव, अजय गरुड, नितीन कराड, संतोष गांगुर्डे, यांच्या पथकाने अधिक्षक सुनिल कडासने, अप्पर अधिक्षक नारायण न्याहळदे, उपअधिक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.

रोकड मोजण्यासाठी मशिन

बागुल याच्या पुणे आणि नाशिक येथील निवासस्थानातून सुमारे 1 कोटी 44 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ही रोकड मोजण्यासाठी मशिनचा वापर केल्याची माहिती एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिली. तसेच दोन्ही घरातून कागदपत्र, बँक लाॅकर, आणि ठेवीच्या पावत्या, जमीन खरेदीचे कागदपत्र मिळून आले असून बागुल याची स्थावर आणि जंगम मालमत्ता काही कोटीच्या घरात असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

बातम्या आणखी आहेत...