आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूचना:विद्यार्थी गुणवत्ता वाढवा, प्रशासकीय कामे गतिमान करा ; शिक्षण आयुक्तांच्या सूचना

नाशिक5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेराेनाच्या काळानंतर सर्व शाळा सुरळीत सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता-वाढीकडे अधिक लक्ष द्यावे. यासाेबतच प्रशासकीय कामे गतिमान करतानाच शिक्षकांसाठीच्या लाेकसेवा हमी कायदा व शिक्षण हमी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना केल्या.

राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे हे बुधवारपासून दाेन दिवस नाशिक दाैऱ्यावर आले आहेत. पहिल्या दिवशी त्यांनी आडगाव येथे माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या कार्यालयास भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर सायंकाळी इंदिरानगर येथील गुरुगाेबिंद सिंग फाउंडेशन येथे नाशिक विभागातील नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील माध्यमिक व प्रा‌थमिक शिक्षणाधिकाऱ्यांसह वेतन पथक अधीक्षकांची बैठक घेतली. बैठकीसाठी दुपारी दाेन वाजेपासून शिक्षणाधिकारी गुरुगाेबिंद सिंग फाउंडेशन येथे येऊन बसले हाेते. प्रत्यक्षात मात्र सायंकाळी ५ वाजता आयुक्त मांढरे यांचे आगमन झाले हाेते. त्यानंतर सुमारे दीड तास त्यांनी आढावा घेतला. यावेळी शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण, नाशिकचे माध्यमिक शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम, धुळ्याचे माेहन देवरे, नितीन बच्छाव, सुधीर पगार आदी उपस्थित हाेते.

शिष्यवृत्तीकडे लक्ष द्यावे : शिक्षक संघटनांची मागणी
आदिवासी जमातीतील हजाराे विद्यार्थी २०१६ पासून शिष्यवृत्ती पासून वंचित आहे. चार वर्षांपासून शिक्षक संघटनांकडून यासाठी पाठपुरावा केला जात आहे. मात्र, अद्यापही त्यांना शिष्यवृत्ती मिळालेली नाही. आयुक्तांनी वेतन पथकाची दप्तर तपासणी करण्यापेक्षा शिष्यवृत्तीसारख्या महत्वाच्या प्रश्नाकडे लक्ष घालावे, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...