आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पुस्तकांशी मैत्री केल्याने समृद्ध ज्ञान; पंचवटीतील श्रीराम विद्यालयात डॉ. प्रकाश देशमुखांचा संवाद

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येकाने मनात जिद्द, प्रामाणिकपणा व अभ्यासासाठी कष्ट घेण्याची मनापासून तयारी ठेवावी. पुस्तकांबरोबर मैत्री करावी अनेक प्रकारची पुस्तके वाचन करावी. वाचनाने ज्ञान समृद्ध होते, असे प्रतिपादनयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव व विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक प्राध्यापक डॉ. प्रकाश देशमुख यांनी केले.

पंचवटीतील श्रीराम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या ६३ व्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी डाॅ. देशमुख बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास ओढेकर होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपाध्यक्ष डॉ. देवदत्त मुखेडकर, सचिव बाबूराव मुखेडकर, विश्वस्त विलास शेळके, चंद्रकांत धोत्रे उपस्थित होते.प्रारंभी शाळेतील गीत मंच यांनी सर्व उपस्थित त्यांचे स्वागत गीताने स्वागत केले. प्राचार्य सुरेश शिंदे यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले.

वार्षिक स्नेह संमेलनानिमित्त शाळेत अनेक भाषा, विज्ञान, चित्रकला व क्रीडा प्रदर्शनांना त्यांनी भेट देऊन सहभागी विद्यार्थ्यांचे खूप खूप कौतुक केले. याप्रसंगी श्रीराम विद्यालय शालेय समिती अध्यक्षा शैलजा हांडगे, माजी प्राचार्य सुभाष पाटील, माजी प्राचार्या लता फोकणे उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचा परिचय कारभारी जोपळे यांनी करून दिला.

सूत्रसंचालन प्राजक्ता शेटे व निशा गाढे यांनी केले. आभार पर्यवेक्षक सुधीर नवसारे यांनी मानले. यावेळी उपमुख्याध्यापक आनंदा केदारे, पर्यवेक्षक उमेश आटवणे, संस्थेचे व शाळेचे पदाधिकारी व सदस्य, शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांचे पालक, माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

वाचन अन् व्यक्तिमत्त्व विकासातून प्रगती
डॉ. प्रकाश देशमुख यांनी विद्यार्थ्यांना शालेय जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला सांगितले. शालेय जीवनात अनेक चांगल्या पुस्तकांचे वाचन करावे तसेच अनेक विविध बौद्धिक, सांस्कृतिक, क्रीडा उपक्रमांमध्ये मनापासून सहभाग घेऊन जीवनाचा आनंद घ्यावा, असेही सांगितले.

वाचन जितके महत्त्वाचे तसे व्यक्तिमत्त्व विकासही महत्त्वाचा असताे. या दाेन बाबी तुमच्याजवळ असल्या तर जीवनात तुम्ही यशस्वी झाले समजा. विद्यार्थ्यांनी वाचन अन् व्यक्तिमत्त्व विकासाचा अवलंब करावा, असे आवाहन देखील देशमुख यांनी याप्रसंगी केले.

बातम्या आणखी आहेत...