आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Enthusiastically Engrossed Tones Mangal Bhairava Through Melodies Flute | Rangali Pt. A Concert By Rajendra Kulkarni, A Special Initiative From Music Lovers

बासरीच्या सुरांमधून मंगल भैरवाच्या स्वरांत रसिक तल्लीन:रंगली पं. राजेंद्र कुलकर्णी यांनी मैफल, संगीतप्रेमींकडून विशेष पुढाकार

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ख्याल शैलीतील आणि विशेषतः प्रात:काळी गायल्या, वाजविल्या जाणाऱ्या, अवरोहातून गंधारच्या वक्र प्रयोगातून बासरीच्या सुरांमधून पुढे जाणाऱ्या राग मंगल भैरवाच्या स्वरांत रसिक तल्लीन झाले. ज्येष्ठ बासरीवादक राजेंद्र कुलकर्णी यांनी ही अनुभूती दिली. स्पीक मॅकेतर्फे नाशिककरांसाठी त्यातही खास विद्यार्थ्यांसाठी के. के. वाघ महाविद्यालयाच्या सभागृहात पुण्याचे प्रख्यात बासरी वादक पंडित राजेंद्र कुलकर्णी यांनी उपस्थितांना अक्षरशः बासरीच्या प्रेमात पडले.

स्पीक मके या चळवळीच्या माध्यमातून नाशकात यापूर्वी सातत्याने दिग्गज कलाकारांचे कार्यक्रम होत असत. मात्र गत पाच वर्षांपासून खंडित झालेली ही परंपरा या बासरी वादनाने पुनरुज्जीवीत झाली. पं. कुलकर्णी यांनी मंगल भैरवने या मैफिलीला सुरुवात केली. या रागामुळे वातावरण मंगलमय झाले होते.कोणतीही रागदारी ऐकताना तो राग म्हणून न ऐकता केवळ त्याचा आनंद आणि आस्वाद घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. त्यानंतर त्यांनी पहाडी रागाच्या सादरीकरणासह भैरवीने मैफलीची सांगता केली. त्याला रसिकांनी भरभरून दाद दिली.

संगीतप्रेमींकडून विशेष प्रयत्न

या वेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. के. एन. नांदुरकर, प्रा. विलास पाटील, प्रा.अजिंक्य जोशी आदी उपस्थित होते. स्पीक मॅकेच्या नाशिकमधील मैफिलींसाठी अमर वैद्य, शैलेश पंडित, देवेंद्र चौधरी, दीपा मौनानी बक्षी, प्रसाद गोखले, रणजीत गाडगीळ आदी संगीतप्रेमींकडून विशेष प्रयत्न केले गेले.

नाशकातील चळवळ

नाशिकमध्ये के. के. वाघ इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये 1999 साली पं. हरिप्रसाद चौरसिया कार्यक्रमाने स्पिक मॅकेची सुरुवात झाली. आजपर्यंत पं. विश्वमोहन भट- मोहन वीणा, डॉ. प्रभा अत्रे, उस्ताद अब्दुल हलीम जाफर खाँ, कुमाल साबरी, वि.आरती अंकलीकर-टीकेकर, डॉ. एन. राजम व इतर मान्यवर कलकारांच्या मैफिलींचे सादरीकरण झाले. मध्यंतरी यात थोडा खंड पडला होता. आता ही परंपरा पुन्हा सुरू होत आहे. येथे स्पिकमॅकेच्या कार्यकर्त्यांची मोठी फळी कार्यरत आहे.

बातम्या आणखी आहेत...