आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेती क्षेत्रात नवीन उद्योजक, व्यावसायिक निर्माण व्हावे या उद्देशाने कौशल्य व रोजगार विभागाच्या वतीने मोफत उद्योजकता विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सह्याद्री फार्म्स येथे संकल्प प्रकल्पांतर्गत मोफत निवासी स्वरूपाच्या उद्योजकता विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून आदिवासी दुर्बल, शेतकरी कुटुंबातील युवक-युवतींनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे करण्यात आले आहे.
नाशिक जिल्ह्यातील आदिवासी दुर्बल आणि शेतकरी कुटुंबातील १०० उमेदवारांना यशस्वी उद्योजक म्हणून ओळख निर्माण करण्याकरिता या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण १० दिवसांचे असून प्रशिक्षणामध्ये नवीन उद्योग उभारणी, मार्केटिंग, बिझनेस प्लॅन तयार करणे, कर्जप्रकरणासाठी सहाय्य इत्यादी बाबींचा समावेश आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक दूरध्वनी क्रमांक ०२५३ - २९९३३२१ किंवा सह्याद्री फार्म्स ८६९८४११२८८, ९२८४६५१०४१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त अनिसा तडवी यांनी केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.