आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्र सरकारने ईपीएस 95 पेन्शनर्सना जगण्यासाठी आवश्यक 9 हजार रुपये महागाई भत्त्यासह फेब्रुवारीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर करावी अन्यथा भाजपच्या खासदार व भाजप कार्यालयांवर तीव्र आंदोलन देशभर केले जातील असा इशारा पंतप्रधानांना निवेदनाद्वारे देण्यात आला.
भविष्य निर्वाह निधी कमिशनर नाशिक विभाग अनिल प्रीतम यांच्या मार्फत नाशिक जिल्हा ईपीएस ९५ पेंशनर्स फेडरेशन वतीने मा. पंतप्रधान, केंद्रीय कामगार मंत्री यांना निवेदन देण्यात आले. 2013 मध्ये तत्कालीन भाजप खासदार व राज्यपाल भगतसिंग कोश्यारी राज्यसभा सदस्य असताना कमिटीने 3 हजार पेन्शन महागाई भत्ता सह लागू करण्याची शिफारस केली होती. मोफत आरोग्य सुविधा देण्याची शिफारस केली होती.
आश्वासन अपूर्ण
2014 लोकसभा निवडणुकीच्या वेळी तत्कालीन भाजप प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी देशातील 70 लाख पेन्शनधारकांना भगतसिंग कोशीयारी अहवाल निवडणुकीत आम्हला मतदान करा सत्तेत आल्यावर 100 दिवस दिवस आत पेन्शन वाढ करू असे आश्वासन दिले होते. आज 9 वर्षे पूर्ण होवून आश्वासन पाळलेले नाही.
तीव्र आंदोलन
2023 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात किमान पेन्शन 9 हजार रूपये दरमहा महागाई भत्त्यासह लागू करावी मोफत आरोग्य सुविधा देण्याची शिफारस लागु करावी अन्यथा देशभर भाजप खासदार व त्यांचे मित्र पक्ष असलेल्या खासदार, भाजप कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
अनेकांनी प्राण गमवले
देशातील 70 लाखावर पेन्शनर पैकी 30 लाखांवर पेन्शनर्सला दरमहा 1 हजार पेन्शन मिळते तर 35 लाख पेन्शनर्सला 1200 ते 2500 पर्यंत पेन्शन मिळते. या पेन्शनमध्ये जगणे अशक्य होत आहे. कोरोना काळात पैश्यांअभावी वैद्यकीय उपचार मिळू शकले नाहीत अनेकांनी आपले प्राण गमवावे लागले आहेत.
महागाई भत्ता लागू करा
सर्वोच्च न्यायालयाने निकालाने दिलेल्या निकाल प्रमाणे पेन्शन संदर्भात अमलबजावणीसाठी निर्णय त्वरित घ्यावा. व जगण्यासाठी किमान पेन्शन 9 हजार रूपयांसह महागाई भत्ता लागू करा अशी मागणी फेडरेशन चे संस्थापक अध्यक्ष राजू देसले, जिल्हा सचिव डी. बी. जोशी, कार्याध्यक्ष चेतन पणेर, जिल्हा अध्यक्ष रमेश सुर्यवंशी, उपाध्यक्ष नामदेव बोराडे, रमेश खापरे सुभाष शलके, रामचन्द्र टीले , कृष्णा शिरसाट उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.