आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

नाट्य निर्माता संघात फूट:नाट्यधर्मी निर्माता संघाची स्थापना; कलाकार-निर्मात्यांनी एकत्रितपणे स्थापन केली नवी संघटना

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाॅकडाऊनमुळे काम नसलेल्या गरजू कलावंतांना आधी आणि नंतर नाट‌्य निर्मात्यांना मदत करावी या आणि अशा अनेक कारणांवरून पन्नासाव्या वर्षात असलेला नाट्य व्यावसायिक निर्माता संघ फुटून जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघ जन्माला आला आहे. नाट्य निर्माता संघातून राजीनामे देऊन अनेक जण बाहेर पडले. त्यांनी आणि इतर काही निर्माते, कलाकारांनी एकत्र येत सोमवारी स्थापन केलेल्या संघटनेच्या अध्यक्षपदी अमेय खाेपकर यांची निवड करण्यात आली.

समविचारी लोक होतो म्हणून एकत्र आलाे
आपण नक्की काय अधारेखित करून काम करायला हवं याबद्दल काही समविचारी लाेक त्या संघटनेतून बाहेर पडलाे आणि हा संघ स्थापन केला. नाटकाशी संबंधित अनेक प्रश्न आहेत ते साेडवून नाटक जागतिक स्तरावर आणखी वर घेऊन जाण्यासाठी ही संस्था स्थापन केली आहे. - महेश मांजरेकर, उपाध्यक्ष

आमच्या संघटनेत राजकारण येणार नाही
नाट्य क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. तसेच मराठी नाटकाला जागतिक स्तरावर नेता यावे याकरिता या नाट्य संंघाच्या नावात जागतिक हे विशेषण नमूद करण्यात आलं आहे. - अमेय खाेपकर, नवनिर्वाचित अध्यक्ष, नाट्यधर्मी निर्माता संघ

नव्या संघटनेची कार्यकारिणी
सल्लागार : लता नार्वेकर, प्रशांत दामले
कायदेशीर सल्लागार : अॅड. हर्षद भडभडे
अध्यक्ष : अमेय खोपकर
उपाध्यक्ष : महेश मांजरेकर
कार्यवाह : दिलीप जाधव
सहकार्यवाह : श्रीपाद पद्माकर
कोषाध्यक्ष : चंद्रकांत लोहकरे
प्रवक्ता : अनंत पणशीकर
कार्यकारिणी सदस्य : सुनील बर्वे, नंदू कदम