आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:मेडिकल टुरिझम समितीची स्थापना; रुग्णांना आकर्षित करण्यासाठी ‘मी नाशिककर’ ग्रुपचा पुढाकार

नाशिक15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकमधील आरोग्यसेवा व सुविधा या जागतिक दर्जाच्या आहेत. अनेक स्थानिक डॉक्टर्स व कित्येक मोठी हॉस्पिटल्सही येथे कार्यरत आहेत. या सर्व हॉस्पिटल्समध्ये होणारे उपचार उच्च दर्जाचे असून ते अन्य कोणत्याही मोठ्या शहरांच्या तुलनेत किफायतशीर दरात उपलब्ध आहेत, याचमुळे विविध शहरे आणि देशांतील रुग्णांना नाशिकमध्ये आणून त्यांना येथे उपचार घेता यावे यासाठी ‘मी नाशिककर’तर्फे आंतरराष्ट्रीय मेडिकल टुरिझम समितीची स्थापना केली आहे.

कर्करोगतज्ज्ञ डॉ. राज नगरकर यांच्या पुढाकाराने तर वरिष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. विनोद विजन यांच्या मार्गदर्शनाखाली समितीची बैठक झाली. यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील विशेष अधिकारी डॉ. ओमप्रकाश शेटे उपस्थित होते. कर्करोग, हृदयरोग, डोळ्यांचे उपचार, सांधेरोपण या उपचारांवर इंडियन मेडिकल असोसिएशनसोबत समिती स्थापन करून पहिल्या टप्प्यात या उपक्रमासाठी लक्ष केंद्रित करणार असून त्यानंतर अन्य व्याधींसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. इको वेलनेस टुरिझमसाठी विशेष प्रयत्न केले जातील.

यासाठी त्र्यंबक रस्त्यावर आंतरराष्ट्रीय योगा विद्यापीठासाठी प्रस्ताव सादर केला जाईल. नाशिक मेडिकल टुरिझमसाठी पोर्टल बनविण्यात येणार असून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सहकार्याने विविध देशांच्या दूतावासातील अधिकाऱ्यांसमोर याचे सादरीकरण करण्याचा निर्णय झाला.

बातम्या आणखी आहेत...