आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावैद्यकीय कारणामुळे युरोप टुर्स रद्द केल्याने संबधित टुर्स कंपनीकडे बुकिंगचे ४ लाख ६६हजार ७८३ रुपये कंपनीनी देण्यास नकार दिल्याच्या विरोधात प्रवाशाने ग्राहक न्याय मंचाकडे तक्रार केली होती. न्यायालयाने दोन्ही पक्षांचे युक्तीवाद ऐकून घेत प्रवाशाला बुकिंगचे टिकीटाचे पैसे व्याजासह परत देण्याचे आदेश दिले.
ग्राहक न्यायमंचाने दिलेल्या निकालानुसार, तक्रारदार डाॅ. चंद्रभान मोटवानी यांनी विणा वर्ल्डच्या युरोप टुर्ससाठी बुकींग केली होती. ४ लाख ६६ हजार ७८३ रक्कम कंपनीला दिली होती. त्यावेळी त्यांची प्रकृती चांगली होती. २ मे २०२० रोजी टुर्स सुरु होणार होती. मात्र कोरोना लाॅक डाऊनमुळे टुर्स रद्द करण्यात आली होती. याच दरम्याण मोटवानी यांना पार्किसनचा विकार झाला. ते प्रवास करु शकत नसल्याने कंपनीकडे बुकिंग रद्द करुन टिकिटाचे पैस परत मगीतले.
कंपनीने १ लाख ४० हजार रुपये वजा करुन उर्वरीत रक्कमपरत देत असल्याचे कळवले होते. मात्र रक्कम ने देताता टाळाटाळ केली. याविरोधात ग्राहक न्यायालयात तक्रार केली.न्यायामंचाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे सदस्य प्रेरणा काळुंखे, सचिन शिंपी यांनी कारणमिमांसा देत तिकीट बुकींग कराराच्या नियमानुसार, मुंबई न्यायालयात केस दाखल करणे गरजेचे होते.
ग्राहकाला या न्यायालयात केस दाखल करण्याचा अधिकार नसल्याचे सांगत कंपनीने बचाव करण्याचा प्रयत्न केला. यावर न्यायमंचाने ग्राहक संरक्षण कायद्याच्या तरतुदीनुसार, कुठेही अर्ज दाखल करण्याचा अधिकार आहे. तक्रारदाराने तिकीट रद्द केल्याने कंपनीचे नुकसान झालेले नाही. नुकसान झाले असेल तर त्यासंबधी कुठलेही कागदपत्र सादर केले नाही. कंपनीने कुठलेही ठोस कारण नसतांना टिकिट बुकिंगचे पैसे परत देण्यास नकार देत ग्राहक सेवा देण्यास कमतरता केली आहे. कंपनीने ग्राहकाला तिकीट बुकींग केल्याच्या रक्कम हाती मिळेपर्यंत १० टक्के व्याजाने ग्राहकाला परत देण्याचे आदेश दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.