आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

24 तासांनंतरही जिंदाल पॉलिफिल्मची आग धुमसतीच:कंपनी परिसरातील केमिकलमुळे आगीवर नियंत्रणासाठी फोमचा वापर

घोटीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कामगारमंत्री खाडेंनी केली कंपनी परिसराची पाहणी

जिंदाल पॉली फिल्म कंपनीत लागलेली आग ही घटना दुर्दैवी असून राज्य शासनाच्या वतीने आग आटोक्यात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी माहिती कामगारमंत्री सुरेश खाडे यांनी प्रसारमाध्यमांना दिली. खाडे यांनी सोमवारी दिली. कंपनी परिसरात मोठ्या प्रमाणात केमिकल असल्यामुळे या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी फोमचा वापर करण्यात येत आहे. दरम्यान, कंपनीत नेमके किती कामगार कामावर होते व किती कामगारांना बाहेर काढण्यात यश आले तसेच किती कामगार आत अडकले आहेत याबाबत कंपनीच्या रजिस्टरची चौकशी करून माहिती घेण्यात येईल. आग पूर्णपणे आटोक्यात आल्यानंतरच याबाबतची नेमकी स्थिती स्पष्ट हाेईल, असेही खाडे यांनी सांगितले. मुंढेगाव औद्योगिक वसाहतीतील जिंदाल पॉली फिल्म कंपनीत नववर्षाच्या दिवशी रविवारी (दि. १) सकाळी ११.३० च्या सुमारास मोठा स्फोट होऊन भीषण आग लागली होती. या दुर्घटनेत दोन महिला कामगारांचा मृत्यू झाला, तर १७ कामगार जखमी झाले होते. २४ तास उलटूनही सोमवारी सकाळपर्यंत कारखान्याच्या या प्लँटमधून आगीचे लोळ आणि धूर बाहेर येतच हाेता. या आग लागलेल्या प्लँटमध्ये काही केमिकलचा साठा आहे. जोपर्यंत हे सर्व केमिकल पूर्णपणे जळून जात नाही तोपर्यंत आग पूर्णत: नियंत्रणात येणार नसल्याचे सांगण्यात अाले

बातम्या आणखी आहेत...