आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विलंब:6 महिने उलटूनही फार्मसीचा तिढा सुटेना; 60 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडलेलेच

नाशिक13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या सहा महिन्यांपासून राज्यात फाॅर्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा तिढा कायम असून राज्यातील तब्बल ६० हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले आहेत. जूनपासून सुरू झालेली अर्ज प्रक्रिया सहा महिन्यांनंतरही म्हणजेच नाेव्हेंबरअखेरपर्यंत सुरुच आहे.शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या प्रवेशासाठी बहुतांश व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश पूर्णत्वाकडे आलेली आहे. तर दुसरीकडे मात्र औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अजून नोंदणी सुरूच आहे. प्रवेशासाठी वारंवार मुदतवाढ देण्यात येत असल्याने गुंतागुंत वाढली आहे. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी जानेवारी महिना उजाडू शकतो. त्यामुळे विद्यार्थी २०२३ मध्येच महाविद्यालयात पाऊल टाकणार आहे. परिणामी काही विद्यार्थ्यांनी इतर शाखांना प्रवेश घेतल्याचे महाविद्यालयांनी सांगितले.

औषधनिर्माणशास्त्र शाखेतून करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून या अभ्यासक्रमाला पसंती दर्शविली जात असते. दरवर्षी या अभ्यासक्रमास उपलब्ध असलेल्या जागांपेक्षा दुपटीपर्यंत प्रवेश अर्ज दाखल होत असल्याने प्रवेशासाठी चुरस असते. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये मात्र जागा रिक्त राहण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. डी. फार्मसी या अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया ठप्प झाल्याने नोंदणीकृत विद्यार्थी आता अन्य पर्यायांची चाचपणी करत आहेत. आता २२ पर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणी करता येईल.

विद्यार्थी २०२३ मध्येच ठेवणार महाविद्यालयात पाऊल नोंदणीच्या प्रक्रियेलाच वारंवार मुदतवाढ दिली जात असल्याने पुढील वेळापत्रक जारी केले जात नसल्याने पुढील संपूर्ण प्रक्रिया आधांतरी आहे. पुढील टप्प्यात प्रारुप गुणवत्ता यादी प्रसिद्ध करून त्यावर हरकतींवर आधारित अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतरच कॅप राउंडची प्रक्रिया पार पडले. त्यासाठी महिनाभराचा कालावधी लागणार असल्याने आता नवीन वर्षातच विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाता येणार आहे.

प्रवेश घटण्याची शक्यता औषधनिर्माणशास्त्र शाखेत प्रवेशासाठी प्रतीक्षेत असलेल्या अनेक विद्यार्थ्यांकडून अन्य पर्यायांची चाचपणी केली जात आहे. बहुतांश विद्यार्थ्यांनी अन्य विविध अभ्यासक्रमांना प्रवेशदेखील घेतले आहे. संशोधन, कल्पकतेवर आधारित या क्षेत्रातील गुणवत्ता यामुळे ढासळू शकते अशी भीती आहे. - प्रा. डाॅ. राजेंद्र भांबर, प्राचार्य, पंचवटी फार्मसी कॉलेज

बातम्या आणखी आहेत...