आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुटुंबियांकडून अवयवदान‎:मृत्यूनंतरही अवयवदानातून‎ त्यांनी दाेघांना दिले जीवदान‎

नाशिक‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

खासगी कंपनीत कामास असलेल्या ‎आणि आेझर मिग येथे राहणाऱ्या ३९ ‎वर्षीय कामगारास घरीच अचानक पक्षघात झाल्याने त्यास रुग्णालयात ‎ दाखल केले. मात्र, तपासणीत‎ त्याच्या मेंदूला तीव्र झटका बसल्याचे‎ आढळून आले. रुग्ण उपचाराला‎ प्रतिसाद देत नसल्याने जवळपास‎ मेंदूमृत झाल्याचे लक्षात आले.‎ त्यानंतर रुग्णालयाने त्यांच्या‎ कुटुंबियांना विश्वासात घेत‎ अवयवदानासाठी तयार केले. संमती‎ मिळताच हाॅस्पिटलने पुढची प्रक्रिया‎ पार पाडल्याने त्यांच्या मृत्यूनंतरही‎ दाेघांचे प्राण वाचविल्याचे माेठे पुण्य‎ कुटुंबियांच्या पदरी पडले.‎ ‎

या कुटंुबप्रमुखास त्रास झाल्याने त्यास‎ अपाेलाे रुग्णालयात हलवि ले.‎ मेंदूराेग विकार तज्ज्ञ डाॅ. जितेंद्र शुक्ल‎ यांनी एमआरआय चाचणी केल्यावर‎ त्यात मेंदूच्या उजव्या भागात मोठ्या‎ प्रमाणात रक्तपुरवठा खंडित होऊन‎ छोट्या मेंदूचे कार्य पूर्णपणे थांबले‎ होते. संदर्भात डाॅ. शुक्ला व‎ अवयव प्रत्याराेपण समन्वयक‎ चारूशीला जाधव यांनी रुग्णांच्या‎ नातलगांना अवयवदानाचे महत्त्व‎ सांगितले.

त्यानुसार कामगाराची‎ पत्नी व नातलगांनी त्यास संमती‎ दिली. पुढील आठ तासांत मेदूमृत‎ व्यक्तीचे यकृत पुण्याच्या सह्याद्री‎ हाॅस्पिटलमधील रुग्णास तर डाेळे‎ नाशिकच्या श्रीगुरुजी रुग्णालयातील‎ रुग्णासाठी प्रत्याराेपण केले. या‎ प्रक्रियेत आयसीयूचे डाॅ. अमाेल‎ खाेलमकर, डाॅ. अतुल सांगळे, डाॅ.‎ राहुल भामरे यांची भूमिका माेलाची‎ ठरली.‎

दु:ख दूर सारून अवयवदानाला संमती
‎अचानक पतीचे छत्र हरपून दाेघा मुलांचा शिक्षणाचा संसाराचा प्रश्न‎ डाेळ्यासमाेर उभा असताना डाॅक्टरांनी अवयवदानाचे महत्त्व सांगताच ते‎ आपल्यात नसले तरी त्यांच्या अवयवाने ते कायम स्मरणात राहतील, अशा‎ शब्दांत रुग्णाच्या पत्नीने भावना व्यक्त केल्या.‎‎

बातम्या आणखी आहेत...