आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौकशी:पाच दिवसांनंतरही 69 लाख रुपयांच्या लुटीचा तपास लागेना

नाशिक13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील बांधकाम व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवत चालकाने आणि अनोळखी इसमाने ६५ लाखांची रोकड आणि कार लुटून नेल्याच्या गुन्ह्याचा तपास अद्याप ‘जैसे थे’ आहे. लुटारू चालकाचा शोध लागत नसल्याने संशयितांच्या कुटुंबियांची आणि त्याच्या संपर्कात असलेल्यांची कसून चौकशी केली जात आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंगळवारी (दि. १५) बांधकाम व्यावसायिक कन्हैयालाल मनवाणी (रा. होलाराम काॅलनी) हे त्यांच्या कारमधून (एमएच १५ जीएफ ९५६७) कारचालक देवीदास शिंदे याच्यासोबत जात असताना होलाराम काॅलनी, आंबेडकर चौक येथे कारमध्ये अनोळखी इसम बसला.

त्याने मनवाणी यांच्या डोक्याला बंदूक लावली. चालक शिंदे याने कार घराकडे न नेता महामार्गावरून विल्होळी येथील जैन मंदिर परिसरात थांबवली. दोघांनी ६५ लाखांची रोकड असलेली बॅग घेत मनवाणी यांना गाडीखाली उतरवून देत कार मुंबईच्या दिशेने पळवून नेली. सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सरकारवाडा पोलिस आणि गुन्हे शाखेच्या पथकांकडून सुरू आहे.

संशयितांच्या मूळगावी शोध
संशयित शिंदे हा आणि त्याचा भाऊ घटनेच्या दिवसापासून फरार आहेत. त्यांचे मूळगाव जव्हार तालुक्यात असून या गावात पोलिसांनी तपास केला. त्यांच्या नातेवाइकांची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती पथकाने दिली.

सीसीटीव्हीची तपासणी
संशयिताने कार विल्होळीकडे नेली होती या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही तपासणी करण्यात येत आहे. संशयितांनी कार राजूर फाटामार्गे त्र्यंबकेश्वरकडे नेल्याचे एका सीसीटीव्हीमध्ये आढळून आले. राजूर फाटा ते त्र्यंबकेश्वर मार्गावरील सीसीटीव्ही तपासणी करण्यात आली, मात्र रात्री अंधार असल्याने सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसत नसल्याने तपासात अडथळा निर्माण झाला.

बातम्या आणखी आहेत...