आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइलेक्ट्रिकल उत्पादनांच्या तपासण्या, संशोधन आणि प्रमाणन (सीपीआरआय) करण्यासाठी, इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅबची उभारणी नाशिकपासून १२ किलोमीटरवर शिलापूर झाली आहे. १०० एकर जागेवर ही लॅब उभी राहत असून निर्धारित वेळेपेक्षा २ वर्ष जास्त झाले तरी ती उद्याेगांसाठी मात्र उपयाेगात येऊ शकलेली नाही. सद्यस्थितीत अजून किमान सहा महिने तरी ही लॅब सुरू हाेण्याची शक्यता नसल्याने उद्याेगांची परवडच आहे. इलेक्ट्रिकल उद्याेगांसाठी देशभरात नाशिक आेळखले जाते, ब्रेकर्स आणि स्वीच गियर्स निर्मीतीचे हब म्हणून नाशिकची ख्याती आहे.
असे असले तरी या उद्याेगांत तयार हाेणारी उत्पादने भाेपाळ किंवा बंगळूरू येथील केंद्रीय विद्युत अनुसंधान संस्थानच्या टेस्टिंग लॅबाेरटरीकडे अंतिम तपासणीसाठी पाठविली जातात. तेथून ती मान्य झाली की, मगच ही उत्पादने बाजारात विक्रिसाठी पाठविता येतात. नाशिकमधून या शहरांमध्ये उत्पादने पाठविण्यासाठी लागणारा वेळ, पैसा यांचा उद्याेगांना हाेणारा जाच या प्रादेशिक तपासणी प्रयाेगशाळेमुळे कायमचाच संपणार आहे.
..ही आहे सद्यस्थिती
लॅबची उभारणी अंतिम टप्प्यात आली असून विविध मशीन, तपासणी उत्पादने यांचे इन्स्टाॅलेशन पूर्ण. विद्युत विभागाने विद्युतीकरणाचे काम पूर्ण केले असले तरी वीजबिलाचा भार कमी करण्यासाठी वीजपुरवठा काही प्रमाणात बंद ठेवण्यात आला आहे.
दिवाळीपर्यंत लॅब कार्यान्वित
दोन दिवसांपूर्वीच या कामाचाआढावा घेतला काम अंतिम टप्प्यात असून दिवाळीपूर्वीच यातील काही टेस्टिंग सुविधा सुरू होतील. टप्प्याटप्प्याने इतर सुविधादेखील कार्यरत होतील. - खा. हेमंत गोडसे
पश्चिम भारतातील उद्याेगांना फायदा
इलेक्ट्रीक उत्पादनांच्या तपासण्या, संशाेधन आणिप्रमाणन यांची सुविधा येथे उपलब्ध हाेणार असल्यानेनाशिकच नाही तर पश्चिम भारतातील उद्याेगांना त्यांचीउत्पादने बंगळुरू किंवा भाेपाळला पाठवायची गरजउरणार नाही. आज तीन ते सहा महिन्यांचा माेठा वेळ,वाहतुकीचा खर्च यांचा भार उद्याेगांना सहन करावा लागतो. - मिलिंद राजपूत, अध्यक्ष, पाॅवर कमिटी, निमा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.