आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाराजी व्यक्त:मेळा संपला तरी व्यापाऱ्यांचे बस्तान

सातपूर4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेच्या जिजामाता शाळेच्या पाठीमागील मैदानावर आयाेजित करण्यात आलेला आनंद मेळावा संपून १४ दिवस झाले तरी या मेळाव्यात सहभागी झालेल्या व्यावसायिकांनी आपले बस्तान तसेच ठेवले आहे. याबद्दल नागरिकांनी महापालिकेत तक्रारी केल्यानंतर संबंधितांकडून नियमाप्रमाणे कर वसुली करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय अधिकारी जयश्री बैरागी यांनी दिली. यामुळे मुलांना खेळण्यासाठी मैदानाचा वापर करता येत नसल्याने नाराजी व्यक्त हाेत आहे.

सातपूर कॉलनीतील मनपाच्या जिजामाता विद्यालयाच्या पाठीमागील मोकळ्या मैदानात १५ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या काळात आनंदमेळा भरला हाेता. मनपाच्या मिळकत विभागाने ८९ हजार रुपये भाडे आकारणी केली आहे. मात्र, १० नोव्हेंबरला मेळा संपल्यानंतरही व्यावसायिकांनी अजूनही जागा साेडलेली नाही.

बातम्या आणखी आहेत...