आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागपूर-मुंबईला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गावरून ताशी 150 किलोमीटर वेगाने वाहन गेले तरी हादरे (व्हायब्रेशन) जाणवणार नाहीत. देशात पहिल्यांदाच महामार्गाच्या एका बाजूच्या 16.50 मीटरच्या 4 मार्गिका ऑटोमेटेड मशीनद्वारे बांधल्या जात आहेत. त्यामुळे काँक्रीटचा थर एकसारखा पसरतो व वाहने स्थिर राहतात. सोबतच पुलांच्या दोन प्लेट्समधील सांध्यात रबर्सचा वापरले आहे. यामुळे वाहनांचे व्हायब्रेशन जाणवणार नाही. ताशी 150 कमी वेगमर्यादेसाठी डिझाइन केलेला हा पहिलाच महामार्ग आहे. महामार्गाचे 70% काम पूर्ण झाले आहे. मार्च 2023 पर्यंत प्रकल्प पूर्ण होऊ शकतो. पहिला ५२० किमीचा टप्पा 2 महिन्यांत वाहतुकीसाठी खुला होऊ शकतो. हा देशातील सर्वाधिक 701 किमीचा इलेव्हेटेड कॉरिडॉर महामार्ग आहे. मुख्य रस्त्याच्या 8 मार्गिका असून दोन्ही बाजूला 3-3 मार्गिका वाहतुकीसाठी, तर एक अतिरिक्त मार्गिका आहे.
73% महागड्या डांबरी रस्त्यांच्या तुलनेत सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांची बांधणी
वाहनांचा वेग वाढतो, तसेच तो तत्काळ नियंत्रणातही आणण्यात मदत वाहन ताशी 150 किमी वेगात असले तरी हादरे जाणवणार नाहीत. यासाठी समृद्धी महामार्गाचा सर्वात वरचा थर हा पेव्हमेंट क्वालिटी काँक्रीटमध्ये बांधला आहे. हे यामुळे वाहनांचा वेग वाढतो, तसेच तो तत्काळ नियंत्रणात येतो. या काँक्रीटमध्ये सिमेंटचा वापर अधिक असतो. त्याचा 32 ते 40 मिमी उंचीचा थर रस्त्याच्या वरच्या भागाचा असतो. अवजड वाहनांची वाहतुकीची संख्या लक्षात घेता याचा वापर महामार्गांकरिता केला जातो.
3 थरांचा रस्ता, पुलांच्या 2 प्लेट्समध्ये सांध्यात रबर्सचा वापर, ते हादरे शोषून घेतात
काँक्रीट रोडवर वेगाने वाहन चालल्यास टायरच्या घर्षणामुळे उष्णता जास्त तयार होते व टायर फुटून अपघात घडतात. आता नवीन तंत्रज्ञानाचे सेव्हन प्लाय रेटिंग व ट्युबलेस टायर वापरात आणले आहे. साध्या हवेच्या सोबतच नायट्रोजन हवा उपलब्ध आहे, नायट्रोजन हवेचे तापमान विस्तारण्याची क्षमता कमी आहे यामुळे टायर फुटण्याच्या घटना या रस्त्यावर होण्याची शक्यता कमीच आहे.
डांबरी रस्त्याचा देखभाल खर्च जास्त
समृद्ध महामार्गाचे बांधकाम डांबरात केले गेले असते तर त्याचा खर्च अर्थातच कमी आला असता. मात्र, डांबरी रस्त्यांचा मेंटेनन्स जास्त असतो, त्याचे आर्युमान कमी असते आणि दर पाच वर्षांनी नवे थर द्यावे लागतात. यामुळे कुठलाही अॅक्सेस कंट्रोल एक्स्प्रेस वे तयार करताना सिमेंटचा पर्याय निवडला जातो.
रोडवर पेव्हमेट क्वालिटी काँक्रीटचा 310 मिमीचा थर सर्वात वर असतो. यात सिमेंटचे प्रमाण अधिक असते. 5.14 कोटी डांबरी रस्त्याचा प्रति किमी बांधणी खर्च 8.91 कोटी प्रति किमी समृद्धी महामार्ग बांधणी खर्च.
स्त्रोत : समृद्धी महामार्ग तांत्रिक विश्लेषण टीम
देखभाल-दुरुस्ती आणि आयुष्याचा दीर्घकालीन विचार करता सिमेंटचे रस्ते हे 20 ते 25 टक्क्यांनी स्वस्त. पुलांच्या दोन प्लेट्समधील सांध्यात रबर्स वापरले आहेत. ते हादरे शोषून घेतात. या मार्गावरून जाताना वाहनांचे व्हायब्रेशन जाणवणार नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.