आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदारक चित्र:आजही 89  अंगणवाड्या उघड्यावरच

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्मार्ट सिटी असा डंका पिटणाऱ्या नाशिक महापालिकेच्या शहरातील ४१९ पैकी ८९ अंगणवाड्या आजही उघड्यावरच भरत असल्याचे विदारक चित्र सर्वेक्षणातून समोर आले आहे. काही ठिकाणी खासगी जागेत तर कुठे मंदिरात अंगणवाडी भरत आहे.

समाजकल्याण विभागाच्या उपायुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर डॉ. दिलीप मेनकर यांनी अंगणवाड्यांना प्रत्यक्ष भेटीद्वारे अडचणी जाणून घेतल्या. त्यात ४१९ पैकी ८९ अंगणवाड्या उघड्यावरच भरविल्या जात असल्याची गंभीर बाब उघड झाली. या अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत मिळवून देण्यासाठी उपायुक्त डॉ. मेनकर यांनी प्रस्ताव तयार केला असून तो आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे.

इमारत व दुरुस्तीचा प्रस्ताव
४१९ पैकी ८९ अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत नाही. १४०हून अधिक अंगणवाड्यांना मूलभूत सुविधादेखील नाही. तेथे पिण्याचे पाणी नाही, दारे, खिडक्यांची दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे या सर्वच अंगणवाड्यांकरिता नवी किंवा पर्यायी इमारत आणि दुरुस्तीसंदर्भातील प्रस्ताव आयुक्तांना सादर केला जाणार आहे. - डॉ. दिलीप मेनकर, उपायुक्त, मनपा

बातम्या आणखी आहेत...