आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामातीचे प्रदूषण रोखून माती वाचवा यासाठी जनजागृती निर्माण करण्यासाठी ईशा फांउडेशनचे संस्थापक श्री. सद्गुरू अर्थात जग्गी वासुदेव यांनी जगभर माती वाचवा ही मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेतंर्गत 11 जून रोजी सदगुरू नाशिकला येत आहेत. मराठा विद्या प्रसारक समाज संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांच्या संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सदरचा कार्यक्रम दुपारी 4.30 वाजता के.टी.एच.एम. महाविद्यालय प्रांगणात संपन्न होणार आहे.
मानवाचे अस्तित्व धोक्यात
प्रगतीची शिखरे गाठताना मनुष्याने स्वत:च्या स्वार्थासाठी पर्यावरणाची अपरिमित हानी केली. याच प्रदूषणामुळे मनुष्याचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. यात माती प्रदूषणाचा देखील समावेश आहे. ‘माती वाचवा’ या मोहिमेतंर्गत श्री. सद्गुरू यांनी 100 दिवसात 27 देशांना भेटी दिल्या आहेत. ही त्यांची सोलो बाइक राईड आहे. 26 देशांना भेट देऊन त्यांचे नुकतेच भारतात जामनगर येथे आगमन झाले. भारतातील विविध राज्यांत भेट दिल्यानंतर 11 जून नाशिकमध्ये येत आहेत. या मोहिमेत श्री. सद्गुरू यांनी 30,000 कि.मी. चा प्रवास केला. ‘माती वाचवा’ हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवला आहे. 21 मार्चला लंडनमध्ये सुरू झालेली ही यात्रा जून अखेरीस कावेरी नदीच्या खोर्यात संपणार आहे.
मातीचे संवर्धन केले तर...
माती वाचवा मोहीम जागतिक अन्न संघटना आणि युनायटेड नेशन्स कनवेन्शन टू कॉम्बॅट डेजर्टिफिकेशन यांच्या माध्यमातून होत आहे. 2050 सालापर्यंत जगभरातील सुमारे 90 टक्के मातीचा र्हास होण्याचा अंदाज संबंधित संस्थेच्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. माती नष्ट झाल्यामुळे जगभरात अभूतपूर्व पर्यावरणीय, आर्थिक आणि सामाजिक आपत्ती संभवतात. तीव्र स्वरुपाचे हवामान बदल, अन्न आणि पाण्याची जागतिक टंचाई, भीषण नागरी संघर्ष आणि प्रत्येक राष्ट्राची सुरक्षा आणि सांस्कृतिक रचना धोक्यात आणणार्या स्थलांतराचा त्या परिणामात समावेश आहे. मातीचे संवर्धन केले तर हे प्रश्न सुटणार आहेत. त्यासाठी ‘माती वाचवा’ ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.