आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सुदृढ व मानासिक आरोग्यासाठी प्रत्येकास याेगा गरजेचा

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जच्या ताणतणावाच्या काळात सुदृढ, निर्मल व निकोप आरोग्य ही दुर्मिळ गोष्ट झाली असून त्यासाठी योगा ही अत्यंत उपयुक्त ठरणारी पद्धती आहे, म्हणून घरोघरी योगा पोहोचविण्याची गरज आहे, इतकेच नव्हे तर प्रत्येक माणसाला योगा शिकणे गरजेचे आहे. याकरिता योगशिक्षकांवर महत्त्वाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन योग विद्या गुरुकुलाचे कुलगुरू व योगाचार्य डॉ. विश्वासराव मंडलिक यांनी केले.

राष्ट्रसंत श्री जनार्दन स्वामी आश्रम, पंचवटी येथे योगा फाउंडेशन, महाराष्ट्र संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघाच्या वतीने पहिल्या राज्यस्तरीय योगशिक्षक संमेलनाला शनिवारी (दि. १०) सकाळी ९ वाजता प्रारंभ झाला. उद्घाटन सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मंडलिक बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर महामंडलेश्वर शिवानंद महाराज, स्वामी माधवगिरी महाराज, संमेलनाचे अध्यक्ष योगाचार्य अशोक पाटील, संमेलनाचे स्वागताध्यक्ष विशाल जाधव, डॉ. प्रज्ञा पाटील, योगशिक्षक संघाचे अध्यक्ष डॉ. मनोज निलपवार, उपाध्यक्ष राहुल येवला, महासचिव अमित मिश्रा, यू. के. अहिरे, डॉ. प्रीती त्रिवेदी आदी उपस्थित होते. डॉ. मंडलिक म्हणाले की, योगा हे जीवनाचे अंतिम उद्दिष्ट आहे. त्यासाठी योगा हा योग्य पद्धतीने शिकणे आवश्यक आहे,संमेलनाध्यक्ष योगाचार्य अशोक पाटील म्हणाले की, योग हा श्वसनावर आधारित आहे.

स्वागताध्यक्ष डॉ. विशाल जाधव यांनी योगाचे महत्त्व स्पष्ट केले. डॉ. प्रज्ञा पाटील यांनी योगासंदर्भातले अनुभव कथन केले. डॉ. मनोज निलपवार म्हणाले की, योगशिक्षक हिताचे कार्य व्हावे म्हणून शिक्षक संघाचे काम सुरू आहे. डॉ. तस्मिना शेख व विजय सोनवणे यांनी योग गीत सादर केले. सुरुवातीला मंत्र उच्चारण, शंखनाथ, सतारवादन करण्यात आले.

मान्यवरांचा सत्कार योगशिक्षक संघाचे कोषाध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, किशोर भंडारी, मंदार भागवत, कुणाल महाजन, गीता कुलकर्णी, विजय सोनवणे, सीमा ठाकरे आदी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन रवींद्र मालुंजकर यांनी केले. सकाळच्या सत्रात योगासने, योगनिद्रा, प्राणायाम, ध्यान, ॲक्युप्रेशर, संगीतमय योग या विषयांवर मनोज नाईक, वसंत काळेकर, अंजली देशपांडे, चंद्रज्योती दळवी, डॉ. तस्मिना शेख, राजेश बाबानी आदींनी मार्गदर्शन केले.

दाेन पुस्तकांचे प्रकाशन
याप्रसंगी जिवराम गावले यांच्या ‘योगानुभूती’ स्मरणिकेचे तसेच योगाचार्य कुणाल महाजन यांच्या ‘हटयोग’ पुस्तकाचे आणि किशन भवर यांच्या ‘योग संजीवनी’ या पुस्तकाचेही प्रकाशन करण्यात आले. यातून याेगाचा प्रसार करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...