आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे, शाहू महाराजांनी समानतेचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समतेचे स्वप्न पाहिले. ते सत्यात उतरवले. त्यामुळे मोठी स्वप्नं पाहा, त्यांचा पाठपुरावा करा. मुलांना आवडीचे करिअर करू द्या. त्यांच्यावर स्वप्ने लादू नका. कोणतेही काम हलक्या दर्जाचे नसते. प्रत्येक कामाला प्रतिष्ठा असते. संत गाडगेबाबांनी ग्रामस्वच्छतेचे तर संत तुकारामांनी जनजागृतीचे काम केले, असे प्रतिपादन साहित्यिक प्रा. गंगाधर आहिरे यांनी केले.
नाशिकरोड वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्थेतर्फे वृत्तपत्र विक्रेत्यांच्या पाल्यांना शालेय साहित्याचे तर महिलांना लकी ड्रॉद्वारे पैठणी, नथीचे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. जेलरोडच्या संत नरहरी मंगल कार्यालयात हा कार्यक्रम झाला. यावेळी राजेंद्र ट्रान्सपोर्टचे राजेंद्र कानडे, वृत्तपत्र वितरण अधिकारी स्वप्निल शेळके (महाराष्ट्र टाइम्स), अभिजित गरुड (सकाळ), कैलास बडगुजर (लोकमत),नीलेश कुंभकर्ण (दिव्य मराठी), संतोष भोर, बाळासाहेब ढोमसे (पुण्यनगरी), प्रसाद क्षत्रिय (लोकसत्ता), जयंत बडवर (पुढारी), आर. आर. पाटील (सामना), विलास गायकवाड, विशाल जमदडे (देशदूत), विजय पांडे (आपलं महानगर), प्रशांत आहिरे (लोकनामा), नाशिकरोड संस्थेचे मार्गदर्शक सुनील मगर, अध्यक्ष महेश कुलथे, उपाध्यक्ष वसंत घोडे, कार्याध्यक्ष उल्हास कुलथे, सचिव भारत माळवे, खजिनदार उत्तम गांगोडे, पदाधिकारी विजय सोनार, किशोर सोनवणे, हर्षल ठोसर, सुनील सूर्यवंशी, सिडको संघटनेचे माजी अध्यक्ष दत्ता ठाकरे, अध्यक्ष अजय बागुल उपस्थित होते. महेश कुलथे म्हणाले की, संघटनेतर्फे सामाजिक उपक्रम राबवले जातात. सिन्नरला टंॅकरने पाणी, वृत्तपत्र विक्रेत्यांना मदत, विडी कामगारांना धान्यवाटप आदींचा त्यात समावेश आहे. सुनील मगर यांनीही मार्गदर्शन केले. संजय लोळगे यांनी सूत्रसंचालन केले. सोहळ्यानंतर सर्व वृत्तपत्र बांधवांना स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
मुलांना मानवतेचे भागीदार करा
कोरोना काळात नातेवाईक दुरावले होते. अशावेळी वृत्तपत्र विक्रेत्यांनी जीव धोक्यात घालून सेवा दिली. आजही ऊन, पाऊस, थंडी याचा विचार न करता सेवाभावी वृत्तीने ते काम करत आहेत. वृत्तपत्र विक्रेत्यांनी समाजाला मदतीचा हात देत आदर्श निर्माण केला आहे. आजचा काळ संदिग्धतेचा आहे. जात, धर्म, प्रांत, वंश, देश यावरुन युध्दे सुरु आहेत. त्यांचे भागीदार आपल्या मुलांना होऊ देऊ नका. त्यांना मानवतेचे भागीदार करा असे प्रा. गंगाधर बागुल यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.