आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोफत शिबिर:मोफत शिबिरात पहिल्याच दिवशी ९० रुग्णांची तपासणी; रविवारी सकाळी १० ते ४ या वेळेत शिबिर होणार

नाशिक13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जनविकास फाउंडेशन व तुळजाभवानी महिला संस्थेच्या वतीने आयोजित दोन दिवसीय शिबिरात पहिल्याच दिवशी ९० रुग्णांची मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सिद्धिविनायक क्लिनिक सावरकरनगर येथे जनविकास फाउंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब जाधव व तुळजाभवानी महिला संस्थेच्या संचालिका सरला जाधव यांनी मोफत रक्त तपासणी, ईसीजी, ब्लड प्रेशर आदीसह सर्व रोगनिदान शिबिराचे मोफत आयोजन केले आहे. डॉ. कपिल झोटिंग, डॉ. नीलेश निकम, डॉ. मयुरी झोटिंग, डॉ. अंकिता निकम, धनंजय रहाणे, अॅड कांचन तुपलोंढे, बापू सोनवणे, नाना वडनेरे, सुधीर सोनवणे, कुलदीप चौधरी, रूपाली भिसे, किरण शिंदे आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रविवारी सकाळी १० ते ४ या वेळेत शिबिर होणार असल्याचे बाळासाहेब जाधव यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...