आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतूक कोंडी:गोदाघाटावर खोदकाम; दरराेज सकाळ-सायंकाळी वाहतूक काेंडी

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्मार्ट सिटीच्या कारभारामुळे नाशिककरांच्या अडचणी दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. गेल्या काही दिवसापासून गोदाघाटावर भूमिगत गटारीच्या कामासाठी खोदकाम सुरू असल्याने या परिसरात सकाळी व सायंकाळी रोजच वाहतूक कोंडी होत असल्याने भाविकांसह स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.

स्मार्ट सिटीमध्ये नाशिकचा समावेश झाल्याने नाशिक मुन्सिपल सिटी कॉर्पोरेशनच्या वतीने विविध कामे केली जात आहे. सांडपाणी व्यवस्थापनासाठी स्मार्ट सिटीच्या वतीने गाेदाकाठी भूमिगत गटारीचे काम करण्यात येत आहे. या कामासाठी गेल्या काही दिवसांपासून थेट जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम केले जात आहे.

मात्र रामकुंड, कपालेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या गाडगे महाराज पूल परिसरात केल्या जाणाऱ्या या खोदकामामुळे या ठिकाणी वाहनधारकांसह पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे. याचा सर्वाधिक फटका या ठिकाणी येणाऱ्या पर्यटक भाविकांसह स्थानिक नागरिकांना बसत आहे नागरिकांच्या वाढत्या अडचणी लक्षात घेता स्मार्ट सिटीने वेगाने हे काम पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.

गज घेण्यासाठी जीव धोक्यात : गाडगे महाराज पुलाशेजारी थेट जेसीबीच्या सहाय्याने रस्ता खाेदला जात आहे. हे काम सुरू असताना रस्त्यामधील गज व इतर साहित्य जमा करण्यासाठी काही लोक आपला जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी धावपळ करत असतात मात्र, या प्रकारामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याकडेही अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...