आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नर्सरी:सातपूर लिंकरोडवर खाेदकाम, रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत

सातपूर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातपूर-अंबड लिंकरोडवरील पपया नर्सरी भागातील विविध ठिकाणी गॅस पाइपलाइन व पाणी गळती दुरुस्ती करण्यासाठी रस्ते खोदण्यात आले आहेत. पाइपलाइन टाकल्यानंतर खोदलेले रस्ते हे डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. रस्त्याच्या कडेला खडी पसरली असल्याने दररोज अपघात होत आहेत. त्वरित डांबरीकरण करावे, अशी मागणी नागरिक करत आहे.

दत्तमंदिर छत्रपती चौक, पपया नर्सरीपर्यंत गॅस पाइपलाइन व पाणीपुरवठा दुरुस्तीसाठी रस्ता खोदण्यात आला, मात्र पावसाळा संपूनही रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. काही ठिकाणी खड्डे बुजवण्यात आले. खडी-माती टाकल्याने बारीक खडी रस्त्यावर पसरली आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी खडतर झाला आहे. या रस्त्यावर भंगार मार्केट, रहिवासी एरिया, हॉटेल असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. रस्त्यावरच्या खडीने स्थानिक रहिवाशांसह वाहनचालक तसेच व्यावसायिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

बातम्या आणखी आहेत...