आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्कृष्ट मानांकन जाहीर:तंत्रशिक्षण कडून सपकाळ फार्मसी काॅलेजला उत्कृष्ट मानांकन श्रेणी

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून २०२१ व २०२२ या शैक्षणिक वर्षात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात नाशिकच्या सपकाळ नाॅलेज हब संचलित इन्स्टिट्यूट आॅफ फार्मसी या महाविद्यालयास नुकतेच उत्कृष्ट मानांकन जाहीर झाले आहे. उत्कृष्ट मानांकन जाहीर झालेले हे नाशिकमधील एकमेव काॅलेज आहे.

राज्य तंत्रशिक्षण मंडळाशी संलग्नित असलेल्या पदविका व इतर अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांचे दरवर्षी सर्वेक्षण केले जाते. यात शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांसह गुणवत्तेचा आलेख बघितला जातो. या परीक्षणानंतर महाविद्यालयांना वेगवेगळी श्रेणी जाहीर केली जाते. तंत्रशिक्षण मंडळाने नुकतेच राज्यातील महाविद्यालयांना वेगवेगळी श्रेणी जाहीर केली आहे. यात नाशिकच्या सपकाळ इन्स्टिट्यूट आॅफ फार्मसी (डी. फार्मसी) महाविद्यालयास उत्कृष्ट मानांकन तर एडीएमएलटी पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमास व्हेरी गुड श्रेणी मिळाली. या उपक्रमांसाठी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र सपकाळ यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

बातम्या आणखी आहेत...