आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामोटार वाहन कर न भरलेल्या, विविध गुन्ह्यात जप्त केलेल्या वाहनांचा 7 जूनला होणारा ई-लिलाव 22 जून रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. पण अजूनही थकीत कर भरला नसल्यास वाहन मालकांना लिलावाच्या दिनांकापर्यंत वाहन कर व पर्यावरण कर भरण्यासाठी संधी नाशिकच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिली असून संबंधित मालकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी केले आहे.
कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक
जाहीर ई-लिलावात सहभागी होण्यासाठी 15 जून ते 20 जून या कालावधीत सकाळी 11 ते सायंकाळी 1 वाजेपर्यंत www.eauction.gov.in या संकेत स्थळावर तसेच नाशिक येथील प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे 62 हजार 200 रुपये रक्कमेचा RTO, NASHIK या नावाने अनामत धनाकर्षसह (डिमांड ड्राफ्ट) सह नाव नोंदणी करून प्रत्यक्ष उपस्थित राहावे. कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे.
40 वाहनांचा होणार लिलाव
दरम्यान या जाहीर ई-लिलावात 40 वाहनांचा लिलाव होणार असू बस, ट्रक, टॅक्सी, हलकी मालवाहू वाहने, व ऑटोरिक्षा या वाहनांचा समावेश आहे. या लिलाव प्रक्रियेत उपलब्ध जीएसटी धारकांनाच सहभाग घेता येईल.वाहने ‘जशी आहेत तशी’ या तत्वावर जाहीर ई- लिलावाद्वारे विक्री करण्यात येणार आहे. या जाहीर ई- लिलावाची प्रक्रिया कोणतेही कारण न देता तहकूब करण्याचा अधिकार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना आहे.
वाहने येथे उपलब्ध
लिलाव करण्यात येणारी वाहने नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिक पेठरोड येथील राज्य परिवहन महामंडळ कार्यशाळा, सिन्नर बस डेपो व बस स्टँड, बोरगाव सिमा तपासणी नाका, येवला बस डेपो, पिंपळगाव बसवंत बस डेपो येथे पाहणी करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.