आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाैकशी समितीचा निष्कर्ष:बसचा अतिवेगच अपघाताचे कारण

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बसचालकाचे वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष व बसचा प्रचंड वेग हेच पळसे येथील अपघाताचे कारण असल्याचा निष्कर्ष या चाैकशी समितीने काढला आहे. शिंदे-पळसे टाेलनाका परिसरात एस.टी. महामंडळाच्या बसच्या अपघातात दुचाकीवरील दाेघांचा हाेरपळून मृत्यू झाला हाेता. ८ ते १० प्रवासी जखमी झाले हाेते. या अपघातानंतर एस.टी.ने स्थापन केलेल्या चाैकशी समितीच्या पाहणीत धक्कादायक बाबी पुढे आल्या आहेत.

चाैकशी समितीने टाेलनाका ते अपघातस्थळाचा प्रत्यक्ष पाहणी करत आढावा घेतला. या चाैकशीत बसचालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करण्याबराेबर अतिशय वेगाने बस चालवत असल्याचे समाेर आले आहे. या अपघाताच्या प्रकारानंतर प्रवाशांच्या सुरक्षितेचा प्रश्न एेरणीवर आला आहे.

बसचा मेंटेनन्सचा प्रश्न बनला गंभीर
एस.टी. महामंडळाच्या बसेसची झालेली स्थिती दयनीय झाली आहे. वाढत्या अपघातास या बसेसच्या दयनीय अवस्थादेखील कारणीभूत ठरत आहे. याबाबत अनेकदा चालकांकडूनही तक्रारी केल्या जात आहे. बसेसच्या मेंटेनन्सकडे देखील एस.टी.च्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...