आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनानंतर वाढला अती तणाव:बर्न आउटचा धोका वाढला; पोलिस, परिचारिकांना सर्वाधिक धोका

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनावरील प्रतिबंध हटल्यानंतर जनजीवन आता पूर्वपदावर आले आहे. जीवनात स्पर्धा सुरु आहे. धकधकीच्या आणि सोशल मिडियाच्या जीवनात कोणीही बर्न आऊटचा शिकार होण्याची शक्यता आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेनुसार नोकरी, व्यावसायाच्या ठिकाणी दिर्घकाळ काम करतांना ताणतणाव होत असल्याने बर्न आऊट सिंड्रोमचा धोका वाढत आहे. या अनपेक्षित आजाराचे लक्षण पोलिस, परिचारीका, डाॅक्टर, शिक्षक आणि वकिलांसह सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांसह छोटे मोठे व्यावसायिकांनाही या आजाराचा धोका वाढला आहे.

कोरोनानंतर सर्वांची प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा सुरु आहे. ताणतणाव हा प्रत्येकाच्या आयुष्यात असतो. तणावाचा शिरकाव कळत न कळत दैनंदिन जीवनात होतो. कमी वेळात जास्त काम ठरलेल्या गोष्टींंसाठी वेळ न काढणे, कामावर लक्ष केंद्रीत न होणे, कामामध्ये निरुत्साह अशा वेळी तणाव असल्याचे निदान होते. हा तणाव दिर्घकाळ राहिला तर बर्न आऊट होण्याचा धोका अधिक असतो. यामुळे संबधित व्यक्तीच्या शारीरीक भावनिक आणि मानसिक सहनशीलता संपून जाते. अशा व्यक्तींनी वेळीच लक्षण ओळखून निदान व उपचार केल्यास हा धोका टाळता येऊ शकतो.

हे आहेत लक्षणे

स्वत:ला असुरक्षित वाटणे, वातावरणाशी जुळून न घेणे, सतत नकारात्मक विचार, भयानक विचार मनात येणे, कामात टाळाटाळ करणे, सकाळी उठतांना मरगळ येणे, कामावर निघतांना उशिर होणे, किरकोळ कामात जास्त उर्जा खर्च करणे, थोडे काम केले तरी दम लागणे, सहकारी व कुटुंबावर अविश्वास दाखवणे, असामाजीक प्रवृत्ती वाढणे, चिडचिड होणे,

हे आहेत धोके

बर्न आऊट हा आजार संतगतीने होणारा दिर्घकालीन टिकणारा आजार आहे. या आजाराने आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढते. स्मरणशक्ती कमी होणे, एकाग्रता कमी होऊन लहरी स्वभाव होणे आपले म्हणणे कसे खरे आहे. हे वारंवार सांगणे, शुल्क कारणांमुळ चिडणे, रागवणे.

या क्षेत्रात सर्वाधिक धोका

पोलिस, आरोग्य आणि इमर्जन्सी सेवा देणाऱ्या विभागात मनुष्यबळ कमी असल्याने सुट्टी घेता येत नाही. कामाचा ताण वाढल्याने मेंदूवर दबाव पडतो. तसेच व्यावसायीक, सामाजीक राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे. यासह शिक्षकांना देखील या आजाराच धोका वाढला आहे.

स्वत:साठी वेळ द्या

मानसोपचार तज्ञ डाॅ. हेमंत सोननीस म्हणाले की, सर्वच क्षेत्रात स्पर्धा आहे. कामच करत राहवे ही मानसिकता झाली आहे. काम आणि करिअरमध्ये सर्वाधिक वेळ दिला जात आहे. शारीरीक मानसिक समस्या वाढत आहे. स्वत:सह कुटुंबियांसाठी वेळ देणे गरजेचे आहे. जीवनात कुठेतरी थांबावे हे पण तितकेच सत्य आहे. स्पर्धा न मानता गरजे प्रमाणे काम करणे गरजेचे आहे.

बातम्या आणखी आहेत...