आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थकीत मुद्रांक शुल्क भरण्यासाठी 31 जुलैपर्यंत नागरिकांना सवलत:कार्यालये शनिवार व रविवार सुरू राहणार

नाशिक6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नोंदणी व मुद्रांक विभागामार्फत दंड माफी अभय योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत थकीत मुद्रांक शुल्क भरण्याचा पहिला टप्पा 31 जुलै राेजी संपणार असून राज्यातील सर्व मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय शनिवार 30 जुलै व रविवार 31 जुलै रोजी फक्त याच कामासाठी सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती नाशिकचे सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांनी दिली आहे.

दंडास 50 टक्के माफी

दंड माफी अभय योजनेअंतर्गत नागरिकांनी 31 जुलै सहभाग नोंदवल्यास थकलेल्या मुद्रांक शुल्काच्या दंडास साधारण 90 टक्के माफी शासनामार्फत देण्यात येणार आहे. 1 ऑगस्टनंतर सहभाग नोंदविल्यास थकलेल्या मुद्रांक शुल्काच्या दंडास 50 टक्के माफी देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने 31 जुलैपर्यंत या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. शनिवार व रविवारी शासन जमा झालेली चलने त्याच दिवशी अथवा 1 ऑगस्टपर्यंत स्वीकारण्यात येतील, असे निर्देश प्राप्त झाले असल्याचेही दवंगे यांनी सांगितले.

योजनेचा लाभ घ्यावा

ग्राहकांना दंड माफीच्या योजनेने मोठ्या प्रमाणात लाभ होणार असून सर्व जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा यासाठी शनिवार रविवार हे दोन दिवस मुद्रांक शुल्क कार्यालय खुले ठेवण्यात येणार आहेत. त्यातच नाशिक शहराचा राज्यभरातील मुद्रांक नोंदणी शुल्क कार्यालयांमध्ये हे सुविधा उपलब्ध करून देण्यात आले असल्याची माहिती राज्याचे नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांनी यांनी दिली आहे. या योजनेचा कालावधी लक्षात घेता ग्राहकांनी वेळेतच संधीचा लाभ घ्यावा असेही म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...