आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजमाता जिजाऊ व्याख्यानमालेत स्वराज्यवीरांचे वंशज राहणार उपस्थिती:शिवव्याख्याते प्रा. सचिन कानिटकरांचे गुरुवारपासून व्याख्यान

नाशिक9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवछत्रपती राजेना घडविणाऱ्या जिजाऊ माँसाहेब याच्या संघर्षमय जीवनाची क्रांतिगाथा मांडणाऱ्या शिवव्याख्याते क्रांतिशाहिर प्रा. सचिन कानिटकर यांच्या तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयाेजन करण्यात आले आहे.

गुरुवार ते शनिवारी राेज सायंकाळी 5.00 वाजता महाकवी कालिदास कलामंदिरात हे व्याख्यान हाेणार असल्याची माहिती संस्कृती नाशिकचे अध्यक्ष, माजी नगरसेवक शाहू खैरे यांनी दिली.

या व्याख्यानमालेस स्वराज्यवीर सुभेदार तान्हाजी मालुसरे यांचे वंशज डॉ. शितल मालूसरे, स्वराज्याचे दक्षिण दिग्विजयी सरसेनापती हंबीरराव मोहिते याचे वंशज विक्रमसिंहराजे मोहिते, खाशा औरंगजेबाच्या छावणीचे कळस कापणाऱ्या सरसेनापती संताजीराव घोरपडे (ममलकतदार) यांचे वंशज उदयसिंहराजे घोरपडे व स्वराज्यवीर विठोजीराव चव्हाण (हिंमतबहाद्दुर) यांचे वंशज संग्रामसिंहराजे चव्हाण हे उपस्थित राहणार आहे.

या व्याख्यानमालेनिमित्त नाशिकरांना ऐतिहासिक वस्तू आणि दस्ताऐवजाचे प्रदर्शनही बघता येणार आहे. त्यात शिवछत्रपतींच्या गळ्यातील कवड्यांची माळ, हबीरराव मोहितेंची वाघनखं, हिमतबहादुर चव्हाणांची लखलखती तलवार अशा वस्तू असणार आहे. तसेच नाशिकच्या आनंद ठाकूर यांच्याकडील शिवकालिन शस्त्रांचे भव्य प्रदर्शन होणार बघता येणार आहे.

शुरसेनापती वंशजांसोबत नाशिकमधील नामवंत खेळाडू, विद्यार्थी व कलापथकांची शोभायात्रा गुरुवारी (1 डिसेंबर) दुपारी अडीच वाजता रोकडोबा तालीम संघ पटांगण, गंगाघाट, नाशिक येथून महाकवी कालिदास कलामंदिर या व्याख्यान स्थळापर्यंत निघणार आहे.

शोभायात्रेचा मार्ग

रोकडोबा, हनुमान मंदिरापासुन नाव दरवाजा - तिबंधा चौक- भद्रकाली मंदिर गाडगे महाराज पुतळा मेन रोड धुमाळ पॉईट महात्मा गांधी रोड यशवंत व्यायाम - शाळा चौक- परशुराम सायखेडकर नाट्यमंदिर पटेल हनुमान, शालीमार चौक खडकाळी सिग्नल जी.पी.ओ. - कालिदास कलामंदिर येथे शोभायात्रेची सांगता होईल.

बातम्या आणखी आहेत...