आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वांतत्र्याच्या अमृत महोत्सव:नाशिकमध्ये तीन दिवस दुर्मिळ नोटांचे प्रदर्शन; मुद्रणकलेत काळानुसार झालेल्या बदलांची माहितीही मिळणार

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्वांतत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने नाशिकरोड येथील भारत प्रतिभुमी मुद्रणालयात 8 ते 10 जुन दरम्यान दुर्मिळ नोटांचे प्रदर्शन आयोजीत करण्यात आले आहे. देशामध्ये नाशिक येथे सर्वात प्रथम सन 1924 मध्ये नोटा छपाईचा कारखाना सुरु करण्यात आला.तेव्हापासुन ते आतापर्यंत छापलेल्या नोटांचे प्रदर्शन जेलरोड येथील नोट प्रेस समोरील रिसर्च अँन्ड डेव्हलपमेंट इमारतीच्या आवारात रहाणार आहे.

नागरिकांसाठी हे प्रदर्शन साठी 9 आणि 10 जुन रोजी सकाळी 9 ते सांयकाळी 7 वाजेपर्यंत खुले रहाणार आहे. मात्र यावेळी आधारकार्ड सोबत ठेवणे बंधनकारक रहाणार आहे.त्यापुर्वी 8 जुन रोजी खासदार हेमंत गोडसे, नवी दिल्लीतील प्रेस महामंडळाच्या सीएमडी तृप्ती पात्रा घोष यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. यावेळी नोट प्रेसचे मुख्य महाव्यवस्थापक बोलेवर बाबू, आयएसपीचे मुख्य महाव्यवस्थापक राजेश बन्सल, प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे हे उपस्थित रहाणार आहे.

सीएनपीचे महाव्यवस्थापक महापात्रा, आयएसपीचे व्यंकटेशकुमार यांची प्रमुख उपस्थिती राहील. नोटप्रेसची स्थापना सन 1924 साली झाली असुन आयएसपीमध्येच सन 1928 पासून नोटांची छपाई सुरु झाली. त्यानंतर सन 1962 मध्ये जेलरोडला करन्सी नोट प्रेस स्वतंत्रपणे सुरु झाली. स्थापनेपासून नोटप्रेसमध्ये एक रुपयाच्या नोटेपासून एक हजार, पाच हजार, दहा हजारापर्यंतच्या नोटा छापण्यात आल्या. सध्या पाच, दहा, वीस, पन्नास, शंभर, दोनशे आणि पाचशेच्या नोटांची छपाई रात्रंदिवस सुरु असते. नोट प्रेसचा इतिहास, मशिनरी, नोटा छापण्याची प्रक्रिया याची माहिती प्रदर्शनातून मिळणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त होणाऱ्या या प्रदर्शनात मुद्रणकलेत काळानुसार झालेल्या बदलांची माहितीही मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...