आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक प्रदर्शनाचा समारोप:अन् विस्तारले करिअरचे क्षितिज; दिव्य मराठी एज्युकेशन अॅण्ड करिअर फेअरला प्रतिसाद

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दहावी व बारावीनंतर विविध क्षेत्रात असलेल्या करिअरच्या संधी, नवनवीन अभ्यासक्रम व विद्याशाखा, शिक्षणक्रमांचे स्वरुप व पात्रता यासह शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून करण्यात आलेले मार्गदर्शन... अशा विविध माध्यमातून विद्यार्थी व पालकांनी करिअरच्या विविध वाटांची माहिती जाणून घेतली. करिअर निवडीच्या पर्यायांचे दालन खुले करणाऱ्या दिव्य मराठी एज्युकेशन अॅण्ड करिअर फेअर या शैक्षणिक प्रदर्शनाचा समारोप रविवारी (दि. ५) जूनला झाला.

गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या प्रदर्शनात शहरातील विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने भेट देत प्रदर्शनातील प्रत्येक स्टाॅल्सच्या माध्यमातून करिअरच्या विविध पर्यायांची माहिती जाणून घेतली. शनिवारी व रविवारी या दोन दिवस घेण्यात आलेल्या करिअर सेमिनारलाही विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी यशस्वी करिअरच्या दिशेने पुढचे पाऊल टाकले आहे.

फॅशन डिझायनिंग, अॅनिमेशन, इंटेरिअर डिझायनिंग, फार्मसी, एमबीए, हॉटेल मॅनेजमेंट अशा वेग वेगळ्या वाटांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने करिअर निवडीचा मार्गही अधिक प्रशस्त झाला. करिअरच्या वेगवेगळ्या वाटांची माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने ‘दिव्य मराठी’तर्फे सिटी सेंटर मॉलसमोरील लक्षिका हाॅल येथे ३ ते ५ जूनदरम्यान आयोजित ‘दिव्य एज्युकेशन अॅण्ड करिअर फेअर’ या शैक्षणिक प्रदर्शनाचा रविवारी समारोप झाला. अखेरच्या दिवशी सुटी असल्याने सकाळपासूनच विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने भेट दिली. प्रदर्शनास भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांमधून लकी ड्राॅद्वारे भाग्यवंत विजेत्यांना गिफ्ट वाटप करण्यात आले.

हॉटेल मॅनेजमेंट : एक यशस्वी करिअर क्षेत्र
दहावी व बारावीनंतर बहुतांश विद्यार्थ्यांचा इंजिनिअरिंग व इतर व्यावसायिक शाखांकडे कल असतो. पालकही आपल्या मुलांवर अपेक्षांचे ओझे टाकत असतात. अनेकदा इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर विद्यार्थी त्या क्षेत्रात यशस्वी होताना दिसत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची आवड व कल लक्षात घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रातील करिअरच्या संधी ओळखून त्यामध्ये शिक्षण घेतल्यास नक्की यशस्वी होता येईल, असा विश्वास प्रा. मानकेश्वर राम यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना व्यक्त केला. त्यांनी एअरलाइन्स व हाॅटेल मॅनेजमेंटमधील करिअरच्या संधी या विषयावर मार्गदर्शन केले. नव्या करिअरच्या पर्यायांची माहिती, अभ्यासक्रमांचे स्वरूप, पात्रता, नोकरी व व्यवसायाच्या संधी या वरही मार्गदर्शन केले.

करिअरचे अनेक पर्याय समजले
^करिअर विषयक पर्यायांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्याने आम्हाला नक्की कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे, याचा निर्णय घेणे आता अधिक सुकर होईल. दिव्य मराठीचे हे प्रदर्शन नक्कीच दिशादर्शक ठरेल.
-मृण्मयी कुलककर्णी, विद्यार्थिनी

तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा फायदा
िदव्य मराठीतर्फे आयोजित प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थी व पालकांना वेगवेगळ्या करिअरच्या वाटा जाणून घेता आल्या. सेमिनारमध्ये केलेले मार्गदर्शनही विद्यार्थ्यांना उपयोगी ठरेल.
-विष्णू शिंदे, पालक

बातम्या आणखी आहेत...